कोरोना पार्श्वभूमीवर तासगावात खा. संजय काका पाटील यांची पालिकेत आढावा बैठक


तहसीलदार,पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी व नगराध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती

तासगाव प्रतिनिधी
कोरणा संसर्ग सध्या तासगाव शहरात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव नगरपालिकेत शहरातील व तालुक्यातील सर्व अधिकारी वर्गाची तातडीची बैठक बोलावली होती यामध्ये प्रामुख्याने तासगाव च्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, मुख्याधिकारी गणेश शिंदे आरोग्य अधिकारी डॉक्टर माळी नगराध्यक्ष डॉ.सावंत उपनगराध्यक्ष सौ. दिपाली पाटील राष्ट्रवादी गटनेते बाळासाहेब सावंत यांची उपस्थितीत पार पडली.यावेळी तासगाव शहरात कोरोना विषाणूचा वाढते संक्रमण यावर चर्चा करण्यात आली व त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला योग्य सूचना करण्यात आले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने काशीपुरा गल्ली येथे रेपिस्ट सुरू आहे ते मोठ्या प्रमाणात करण्याची करण्यात यावी  भागांमध्ये बरेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत तर अनेक जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. मुस्लिम मोहल्ला येथे तातडीने रॅपिड टेस्ट करण्याची आवश्यकता आहे.तासगाव शहरांमध्ये तातडीने आरोग्य सेविकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे शहरांमध्ये सर्व भागांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी सातत्याने औषध फवारणी करण्याची आवश्यकता आहे ज्या भागांमध्ये कंटेनमेंट झोन आहे. त्या भागातमधील नागरिक बिनधास्तपणे शहरांमध्ये फिरत असतात त्याच पोलिस प्रशासनाने अटकाव करण्याची गरज आहे. तर व जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या वर नगरपालिका प्रशासनाने लक्ष ठेवण्याची नगरपालिकेच्या माध्यमातून गरज आहे नगरपालिका आरोग्य यंत्रणा सज्ज कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे ५५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांची तातडीने तपासणी करणे आवश्यकता आहे ग्रामीण रुग्णालय येथे स्टाफ कमी आहे तेथे वाढ करण्यासाठी योग्य त्या सूचना प्रशासनाला देणे गरजेचे आहे तसेच शहरातील बोथरा हॉस्पिटल हे सुसज्ज करण्यासाठी करण्याची गरज आहे तासगाव शहरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असून लोकप्रतिनिधी पत्रकार यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे पण हे होताना दिसत नाही नगरपालिकेची गॅस दाहीणी सध्या सुरू असून ते पूर्णवेळ कार्यरत राहण्यासाठी जादा व्यक्तींची नियुक्ती करण्याची गरज आहे अंबुलन्स २४ तास सतर्क ठेवणे व त्यासाठी खासगी दवाखान्याची अंबुलन्सची मदत घेणे आवश्यक आहे.यावेळी तासगाव नगरपालिकेचे नगरसेवक गायकवाड सर यांनी हॉस्पिटल उभारणीसाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे यावेळी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी सांगलीचे प्रसिद्ध डॉक्टर रविकांत पाटील यांच्याशी संपर्क करून तासगाव मध्ये सुरू करण्यासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन योग्य यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात यावी, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांच्या बरोबर प्रशासनाने नेहमी समन्वय साधणे गरजेचे आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमोल शिंदे, सत्ताधारी भाजपचे पक्षप्रतोद अनिल कुत्ते,नगरसेवक दत्ता रेंदाळकर,बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजीत माळी, तानाजी पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष खंडू कदम, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, स्वच्छता प्रभारी अधिकारी प्रताप घाडगे, राजू काळे, राजू माळी, आयुब मणेर, महादेव लुगडे, इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment