दैनिक जनमत : महाजनको ला स्वातंत्र्य दिनाचे वावडे?

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Saturday, August 15, 2020

महाजनको ला स्वातंत्र्य दिनाचे वावडे?

 


ध्वजवंदन न करण्या इतपत अधिकाऱ्यांची मजल!

उस्मानाबाद - आज देशभरात ७४ वा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव एम आय डी सी मध्ये असलेल्या महाजेनेको च्या कार्यालयात साधे ध्वजवंदन टाळत स्वातंत्र्यदिन साजरा न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  

याबाबत माहिती अशी की कौडगाव एम.आय. डी.सी. मध्ये महजेनेको अंतर्गत ५० मेगा वॅट चा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे. या कार्यालयात साधारण २० कर्मचाऱ्यांचा राबता आहे. ध्वजवंदन करण्यासाठी ध्वजस्तंभ देखील उभारण्यात आला आहे. २६ जानेवारी रोजी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता मात्र ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी किंवा साधे ध्वजारोहण करण्यासाठी कोणीही फिरकले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इथल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाचे वावडे आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत कौडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास नाईकवाडी यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार देखील केली असून यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झालेल्या प्रकाराबाबत माहिती विचारण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र त्यांनी फोन उचलला नाही.


काय आहे तक्रार

सामाजिक कार्यकर्ते विश्वास नाईकवाडी यांनी प्रशासनाकडे ईमेल द्वारे ही तक्रार केली आहे.

शासकीय ठिकाणी ध्वजारोहण न केल्यामुळे गुन्हे दाखल करण्याबाबत ...15 ऑगस्ट 2020 रोजी देशभर शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे. पण कौडगाव पो.अंबेजवळगे ता.जि. उस्मानाबाद येथे  महाराष्ट्र शासनाच्या महाजेनको  अंतर्गत चालू असलेल्या 50MW सौरऊर्जा प्रकल्पात ध्वज स्तंभ असताना सुद्धा ध्वजारोहण करण्यात आलेलं नाही.जवळपास 20 शासकीय अधिकारी आणि कर्मचारी रोज या ठिकाणी उपस्थित असतात मात्र आजच्या दिनी या ठिकाणी कोणीही उपस्थित राहिले नाही.आपल्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजाला वंदन करण्यास या सर्वांनी असमर्थता का दर्शवावी याची सखोल चौकशी होऊन त्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई व्हावी.