पलूस (विशाल कांबळे)
डॉ. विश्वजीत कदम यांनी या दिलेल्या यांत्रिक बोटीमुळे प्रशासनाला एक मौलिक मदत झाली आहे. ख-या अर्थाने महापुर येवूच नये यासाठी आम्ही शासन स्तरावर योग्य खबरदारी घेत आहोत. आताच्या सध्याच्या पाण्या संदर्भामध्ये त्यांनी प्रशासन पाण्याचे नियोजन कसे करत आहे. याची माहिती दिली. विश्वजीत कदम हे डॉ. पतंगराव कदम यांच्या झंजावंताप्रमाणे काम करत आहेत. पुढील ५० वर्षामध्ये या मतदार संघाचा ते प्रतिनिधी म्हणुन काम करतील यात शंका नाही. असे विचार ना. जयंत पाटील यांनी औदुंबर येथे व्यक्त केले.
औदुंबर (ता. पलुस) येथे डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधी मधुन ना. डॉ. विश्वजीत कदम यांच्या सौजन्याने यांत्रिक बोटीचे ब्रम्हनाळ बोट दुर्घटनेतील कुटूंबीयांच्या हस्ते या बोटींचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
या लोकार्पण सोहळ्यावेळी ना. जयंत पाटील पुढे म्हणाले आमच्या मंत्रीमंडळामध्ये तरूण मंत्री असल्यामुळे त्यांचा अधुनिकते कडे कल आहे. ही विचारण सरणी राज्याच्या दुष्टीने विधायक स्वरूपाची आहे. विश्वजीत कदम यांनी पुढचा काळ ओळखुन २५ वर्षे टिकतील आशा वेगवान, कमी जागेत, कमी पाण्यात चालणा-या बोटी लोकार्पण केल्या आहेत. त्यांनी चांगल्या दर्ज्यासाठी वेगळा विचार करून परदेशातुन या बोटी मागविल्या आहेत. त्यांनी या बोटी दिल्या बद्दल शासनाच्या वतिने आभार मानतो. या सर्व बोटींची १ तासात १ हजार लोकांना पुरात बाहेर काढण्याची क्षमता आहे.
स्वागत व प्रास्ताविक करताना विश्वजीत कदम म्हणाले २०१९ साली कृष्णेच्या महापुरात ब्रम्हनाळ येथे बोट दुर्घटना झाली. यात अनेकांची जिवीत हानी झाली. महापुर सदृश्य काळामध्ये आशा प्रकारची दुर्घटना होवु नये यासाठी कृष्णाकाठा वरिल गावामध्ये या बोटी वापरण्यात येणार आहे. २०१९ साली च्या महापुरामध्ये ज्यांनी ज्यांनी अभुतपूर्व काम केले. त्यांच्या बद्दल मी कतृज्ञता व्यक्त करतो.
कोरोनामुळे जगतिक मंदी, तसेच देशात राज्यात अार्थिक अडचण आहे. त्यामुळे गत वर्षी आलेल्या महापुरानंतर शासनाने जाहीर केलेली कर्ज माफी, व नियमित कर्ज परत फेड करणा-या शेतक-यांमा कर्ज माफीची जाहीर केलेली रक्तम मिळणार यात शंका नाही. पण मंदीच्या सावटामुळे थोडा उशीर होईल.
याप्रसंगी खा. संजय काका पाटील आ. मनसिंगराव नाईक, अरूण लाड, महेंद्र लाड, जि. प. सदस्य सुरेंद्र वाळवेकर, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुड्डी, ए. डी. पाटील, आनंदराव मोहिते, गिरीष गोंदिल, संग्राम पाटील, यासह तालुक्यातील अनेक मान्यवर, नागरिक उपस्थित होते. हा सर्व कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवुन व मास्कचा वापर करून करण्यात आला. सरपंच अनिल विभुते यांनी आभार मानले.
औदुंबर (ता. पलुस) येथे डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधी मधुन कृष्णाकाठावरिल गांवांच्यासाठी यांत्रिक बोटीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना जयंत पाटील, सह ना. विश्वजीत कदम, व इतर मान्यवर