दैनिक जनमत : मानेवाडी ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामसेवकाविरूद्ध तक्रार; दखल घेईना प्रशासन

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Monday, August 24, 2020

मानेवाडी ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामसेवकाविरूद्ध तक्रार; दखल घेईना प्रशासन



उस्मानाबाद :- तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारविरोधात एकत्र येत तक्रार देऊनही अद्याप पर्यंत ग्रामसेवकाची बदली न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
             याबाबत माहिती अशी की,   मानेवाडी येथील एकूण सात सदस्यांपैकी सहा सदस्यांनी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मानेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री दीपक होळकर यांच्या मनमानी कारभार व ग्रामपंचायत मधील सदस्यास  विश्वासात न घेणे,  ग्रामपंचायतच्या कोणत्याही योजनेबद्दल ग्रामस्थांना माहिती न देणे, सर्व सामान्या नागरिकांची आडीअडचणी सोडवत नाहीत उलट उद्धट बोलणे,    सरपंच व उपसरपंच यांना हाताशी धरून मौजे मानेवाडी येथील गावठाण मध्ये बेकायदेशीर प्लॉट पाडून त्याची परस्पर विक्री करणे, त्यांच्या ठरलेल्या वाराप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये न येणे दहा पंधरा दिवसाला एकदा येतात, रूजू झाल्यापासून एकदाही राष्ट्रीय सणाला न येणे ,दाखला व सही घेण्यासाठी तुळजापूर ला  व त्याच्या मुळ गावी उस्मानाबादला जावे  लागते, ग्रामसेवक दिपक होळकर यांना  गावच्या विकास कामात  जराही रस नाही, अश्या आशयाच्या तक्रारीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा  परिषद यांना दिले आहे. तसेच मानेवाडी येथे  बेकायदेशीर प्लाॅट पाडुन  विक्री केल्या प्रकरणी ग्रामसेवकावर कार्यवाहीचा आहवाल आला आसता त्याच्यावर कारवाई ही केली नाही  उलट  संबधित ग्रामसेवकांना पाठीशी घातले जात असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे  या  संदर्भात   गेल्या सहा ते सात महिन्यापासून  गटविकास आधिकारी प्रशांतसिग मोरोड  याना चार ते सहा वेळेस अर्ज करूनही कारवाई तर नाहीच त्याची बदली  ही  केली अशी सदस्यांची तक्रार आहे निवेदनावर     शहाजी ज्ञानोबा हाक्के, महावीर रामा सगट,  स्वाती सुरेश माने, विजया शिवाजी देवकर, शालुबाई शरणाप्पा बर्वे, कविता तुकाराम हाके या सर्व या सदस्यांच्या सह्या आहेत.