पत्नीसह सासुवर कुऱ्हाडीने सपासप वार करून दोघींचा पडला मुडदा परंडा:-( दत्ता नरुटे )चरित्र्यांच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या तर  सोडविण्यास गेलेल्या सासुची देखील हत्या करण्यात आल्याची घटना परंडा तालूक्यातील  सरणवाडी येथे दि २८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी आरोपी हरिश्चंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे .
 या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की सणवाडी येथिल हरिश्चंद्र जाधव याचे लग्न सारीका हिच्याच्या १७ वर्षा पुर्वी झाले होते त्याना समाधान मुलगा व ऋतुजा मुलगी असे दोन आपत्ये आहेत .
मागील ३ ते ४ वर्षा पासुन हरिश्चंद्र जाधव हा पत्नी सारीकाच्या चरित्र्यावर संशय घेत असल्याने सतत भांडणे होत असल्याने गेल्या ७ ते ८ माहिण्या पासुन सारीका ही आई वडिला कडे पुणे येथे राहत होती . तर मुलगा , समाधान व मुलगी ऋतुजा हे सरणवाडी येथे राहत होते .
मुलांना पुणे येथे घेऊन जान्या साठी सारीका ही आई लक्ष्मी सह दि २८ रोजी सरणवाडी येथे आली होती मुलांना पाठविण्याच्या कारणा वरून हरिश्चंद्र व सारीका यांच्यात भांडणे झाली या वेळी हरिश्चंद्र जाधव याने पत्नी सारीका च्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला  भांडण सोडवीण्या साठी सासू लक्ष्मी गेली असता त्यांच्या वर देखील  कुऱ्हाडीचे हल्ला केला या मध्ये सारीका व लक्ष्मी  दोघी जागीच ठार झाल्या .
मयत लक्ष्मी यांचा मुलगा राहुल दादा क्षिरसागर यांच्या फिर्यादी वरून आरोपी हरिश्चंद्र जाधव याच्या विरूध्द परंडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.निरिक्षक  सय्यद हे करीत आहेत

No comments:

Post a Comment