पंढरपूर : प्रतिनिधी
गेल्या पन्नास वर्षापासून लाखो कुटुंबांना आधार देणारा आधारवड कोसळला ! पांडुरंग परिवारातील प्राणतत्व नाहीसे झाले ! पंत गेले... !
या तालुक्याचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील संत प्रवृत्तीचे लोकनेते सुधाकरपंत परिचारक यांचे काल सोमवारी रात्री साडेअकरा वाजता दुःखद निधन झाले .
लाखो कार्यकर्त्यांचा आधारवड कोसळला.
आज सकाळपासून पंढरपूरकरच नव्हे तर पंढरपूरचे अवकाश देखील रडत आहे . पंढरपूरकरांनी आपल्या घरचा माणूस गमावला आहे अशा दु:खवेगामध्ये प्रत्येक जण शोकाकुल आहे.
कार्यकर्त्यांचा भावना अनावर झाल्या आहेत.
त्यांच्या जाण्यापेक्षाही ते या पद्धतीने गेले .... त्यांचे अंत्यदर्शनही आम्ही घेऊ शकत नाही या भावनेने कार्यकर्ता व्याकुळ झाला आहे.
त्यांच्यावरील पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत मोजक्या पंचवीस लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आहेत , अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी सोशल मीडिया वरून दिली आहे .
सुधाकरपंत परिचारक यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी उंची प्राप्त करून दिली . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून त्यांना एकदाच राज्यस्तरावरील सत्तेत बसण्याची संधी आली त्यातही त्यांनी हे महामंडळ नफ्यामध्ये आणून आपल्या निरपेक्ष कार्याची प्रचिती दिली होती .
सहकारातील डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती . अडचणीमध्ये - तोट्या मध्ये असलेले उद्योग फायद्यामध्ये आणून ते सभासदांचे आधारस्तंभ म्हणून पुढे करण्याची त्यांची ख्याती होती.
आज त्यांनी नव्याने उभे केलेले केलेला पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंढरपूर अर्बन बँक , भीमा सहकारी साखर कारखाना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले युटोपियन शुगर , कर्मयोगी विद्यानिकेतन , त्यांच्या सहकार्याने उभे राहिलेले दामाजी साखर कारखाना आणि तालुक्यातील 50 हून अधिक सोसायटी, दूध संघांचे जाळे हे आज हजारो हजारो लोकांना रोजगार देत आहेत .
आपल्या कारकिर्दीत पाच वेळा आमदार किची टर्म भूषविणाऱ्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही याचा प्रत्येकाला मनाला चटका लागला आहे..