दैनिक जनमत : खासदारांच्या गावभेटीतील ती व्यक्ती पाॅझिटीव्ह

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Friday, August 7, 2020

खासदारांच्या गावभेटीतील ती व्यक्ती पाॅझिटीव्हउस्मानाबाद - तालुक्यातील पाडोळी येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर  खासदार ओमराजे यांनी पाहणी दौरा केला होता. त्या दरम्यान रुग्णाच्या संपर्कातील क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीने उपस्थिती होती. (याबतचे वृत्त दैनिक जनमत ने ४ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते.) त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला असल्याने तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यावेळी उपस्थित सर्वांचे ट्रेसिंग करून त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम आता स्थानिक यंत्रणेला करावे लागणार आहे. क्वारंटाईन असलेले व्यक्ती बाहेर फिरतात कसे? प्रशासन आणि आरोग्य विभाग समुपदेशनाचे काम व्यवस्थित करते की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाडोळी गावात नविन ७ रुग्ण आणि पूर्वीचा १ रुग्ण मिळून एकूण संख्या आठ झाली आहे. तसेच एखाद्या गावात रुग्ण आढळल्यानंतर लोकप्रतिनिधी आढावा घेण्यासाठी प्रतिबंधित भागाचा दौरा करतात. त्यांना आढावा घेण्यासाठी जिल्हा पातळीवर बैठकीचे आयोजन केले जावे अशी मागणी जनतेतून होत आहे.