तासगाव प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांनी चार दिवसापूर्वी तासगाव तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुमनताई आर पाटील यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला व त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी तोफ डागून एकच खळबळ माजवून दिली. विशेष म्हणजे या मागणीला काँग्रेस पक्ष,शिवसेना,शे.का.प. स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन्ही. प्रहार संघटना इत्यादी पदाधिकाऱ्यांनी यावर सह्या केलेले आहेत असे निदर्शनास आले आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. तसेच काल आरपीआय आठवले गट चे तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे यांनीही पत्रक काढून वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर टीका करत तासगाव कवठेमहांकाळ च्या आमदार सुमनताई पाटील यांची उघडपणे पाठराखण केली आहे.
या सर्व टीकाटिपणी व उनी दुनी संदर्भात संभाजी ब्रिगेड चे तासगाव कवठेमंकाळ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शिवश्री अमोल कदम यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तासगाव शहरासह तालुक्यात जास्तीचा होताना दिसत आहेत रोजच्या रोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. तासगाव शहरात आतापर्यंत २३ कोरोना बाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणि आज मितीस रोज शहरात दहापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. उद्यापासून (रविवार) एक आठवडा तासगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आपला व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोणा बाधित रुग्णांना सांगली येथे बेड मिळत नाहीत व उपचाराअभावी काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सर्वात महत्त्वाचे सर्वच राजकीय पक्षांनी आपण स्वतः काय केलं किंवा इतरांनी काय केलं या खोलात न जाता सर्वच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तासगाव शहरांमध्ये तातडीने कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटर व अक्सिजन सहित ग्रामीण रुग्णालय येथे कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर कसे सुरू होईल यासाठी सामुदायिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. खासदार संजय काका पाटील हे सध्या कोविड हॉस्पिटल उभारणी संदर्भात प्रयत्न करताना दिसत आहेत.सध्या महाराष्ट्र मध्ये तीन पक्षाचे महा विकास आघाडीचे सरकार असून पक्षाच्या पदाधिकारी व आमदार सुमनताई पाटील यांनी आपली ताकद पणाला लावून कोविड हॉस्पिटल तातडीने सुरू करण्यासाठी आपले योगदान देणे ही काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यात ही जनता कोणत्याच पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांना माफ करणार नाही. राहता राहिला राजीनामा मागणे हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत मामला असतो त्यामुळे कोणत्या पक्षाचे अध्यक्ष अथवा ज्येष्ठ राज्य पातळीवरील नेतेमंडळी अशी टीकाटिपणी करण्यास कधीच परवानगी देत नाहीत.