दैनिक जनमत : एसटी अनुसुचित जमातीच्या सवलतीची त्वरीत अंमलबजावणी करण्याची धनगर समाजाची मागणी

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Tuesday, September 22, 2020

एसटी अनुसुचित जमातीच्या सवलतीची त्वरीत अंमलबजावणी करण्याची धनगर समाजाची मागणी

उस्मानाबाद
धनगर समाजाचा एसटी आरक्षणाची सवलती आदेश काढून त्वरित अंमलबजावणी सुरू करावी या मागणीसह इतर मागण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना निवेदन  देण्यात आले.
गेल्या दोन वर्षापासून प्रलंबीत असलेली मेगा भरती , सरकारी नोकरी ७२ हजाराची मेगा भरती त्वरित सुरू करावी,एक हजार कोटीच्या थांबवलेल्या योजना निधीची तात्काळ अंमलबजावणी सुरू करणे बाबत,मेंढपाळ वरील हल्ले थांबवावेत त्यासाठी त्वरित कडक कायदा करावा व
मेंढपाळांना शस्त्र परवाना देवून मोफत शस्त्र देण्यात यावे, शासकीय वसतीगृहापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यासाठी घोषीत केलेली स्वयंम  योजने ची अंमलबजावणी करण्यात यावी . या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.निवेदनावर प्रा. सोमनाथ लांडगे, डॉ. संजय सोनटक्के, डॉ. संतोष पाटील, गणेश एडके, इंद्रजीत देवकते, राहुल काकडे, बालाजी वगरे, ॲड. दशरथ कोळेकर यांच्या स्वाक्षरी आहेत.  यावेळी उस्मानाबाद तालुक्यातील धनगर समाजाचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती

 चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदा...