मी अनुभवलेले राणादादामी उस्मानाबाद येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सन २०१४-१५ वर्षी दुसऱ्या वर्षात शिकत होतो. एका काम निमित्त आम्ही आ.राणादादा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात म्हणजे प्रतिष्ठान भवन येथे गेलो. तेथे दादांचे सोशल मीडिया प्रमुख असलेले इर्शाद काझी यांची भेट झाली. त्यांची फेसबुकवर आधीच मैत्री होती पण आज प्रत्यक्ष भेट झाली. चर्चेदरम्यान त्यांनी आम्हाला सांगितले की दादा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फिस माफी साठी मुख्यमंत्र्यांना १०,००० सह्यांचे निवेदन देणार आहेत. आम्ही बोललो कि आपल्या कॉलेज मधून पण सह्या आम्ही घेतो. आम्ही कॉलेज मधील सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी सह्या घेतल्या. एवढंच नाही तर उस्मानाबाद व परिसरातील सर्व महाविद्यालयांना भेटी देवून १० हजार विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम राबविली आणि खऱ्या अर्थाने याच माध्यमातून माझी राजकीय वाटचाल सुरू झाली.


त्यानंतर काही दिवसातच आमच्या बॅच मधला एक मित्र आमच्याकडे आला आणि म्हणाला कि मला राणादादांना भेटायचे आहे. मि राणादादांच्या स्वीय सहाय्यक यांच्या नंबर वर फोन केला त्यांनी आम्हाला शासकीय विश्रामगृह येथे भेटायला येण्यासाठी सांगितले. आम्ही लगेच तेथे गेलो. दादांनी विचारले तुमचे काही काम आहे का?  मि बोललो दादा हा मुलगा आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजला आहे आणि बीड जिल्ह्यातील आहे. त्याच्या भावाची किडनी गेली आहे. बाहेर हॉस्पिटलला विचारले तर खर्च १५ लाख सांगत आहेत. त्याची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने एवढे खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही तुमची भेट घ्यायला आलो आहोत. आमच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दादांनी लगेच मुंबई येथे डॉ.तात्याराव लहाने यांना फोन केला आणि सगळा विषय सांगितला.


फोन झाल्यानंतर दादांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही डॉ.लहाने यांना त्वरित भेटा, त्यांना मी बोललो आहे. त्यांनी सांगितले कि ५ लाखापर्यंत खर्च येईल. दादांच्या एका कॉल मुळे १० लाख खर्च कमी येणार हे ऐकून त्या मुलाच्या डोळ्यात पाणीच आले. दादा बोलले कि रडू नका. आजच डॉ.लहाने डॉक्टरांना भेटा तसेच काही अडचण आली तर मला कॉल करा असे बोलत त्या मुलाला धीर दिला. कोणतीही ओळख नसताना आणि जिल्ह्याबाहेरील व्यक्तीसाठी राणादादांनी एवढं केलं याचेच आश्चर्य वाटले आणि ऐकलेले दादा आज प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. या घटनेमुळे दादांचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान देखील वाटला.

या भेटीमुळे दादांच आणि माझं नेता आणि कार्यकर्ता हे नातं आणखीन घट्ट झालं आणि हे आजतागायत ते अबाधित आहे. माझे मित्र मला दादांचा कट्टर कार्यकर्ता असे म्हणतात याचा मला खरंच गर्व आहे. दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


स्वानंद पाटील

No comments:

Post a Comment