शिराळा येथील बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करा शेतकऱ्यांची मागणी

 



        परंडा :-     परंडा तालुका येथिल अतिवृष्टी ने  शिराळा येथिल बंधार्याच्या पश्चिम बाजुने सिना नदीचे पात्र खचुन बंधार्याचे मोठे नुकसान झालेले आहे. त्या मुळे सिना उजनी बोगद्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शिराळा उपसा सिंचन योजनेच्या व बंधार्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेती चिंचनाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शिराळा, लोणी.वडणेर,देवगांव,आवारपिंपरी,कपिलापुरी, वागेगव्हाण,आसु , लोहारा या गावातील शेतकऱ्यांचे भविष्यातील शेतातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. अतिव्रूष्ठिच्या पाण्यामुळे बंधारा फुटल्याने उजनी बोगद्यातून  येणारे पाणी शिराळा बंधार्यात थांबनार नाही .त्या मुळे शिराळा उपसा सिंचन चालू करण्यास आडथळा येणार आहे .तसेच बंधार्यातील पाण्यावर अवलंबून आनेक शेतकऱ्यांनी लाखो रु खर्च करुण पाईपलाईन केलेल्या आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस ,द्रक्ष ,बोर,केळी ,दाळिंब व इतर पिके घेतली आहेत  बांधार्याची बाजु तुटल्याने शेती सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदरील बांधार्याची तत्काळ दुरुस्ती करुण भविष्यात शेतकऱ्यांना होणाऱ्या मनस्तापासून शेतकऱ्यांची सुटका करावी आश्या मागणीचे निवेदन तालुक्यातील शेतकऱ्यांनि अनिलकुमार हेळकर यांना  देण्यात आले. या निवेदनावर लोणी,आसू,वडणेर,नालगावमधील शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

No comments:

Post a Comment