कुर्डूवाडी दि.११(प्रतिनिधी)
स्वाभिमानी युवा मंचच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तब्बल १०१ रक्तदात्यानी रक्तदान केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन लक्ष्मण पाटील,शशिकांत नरुटे,अभिजित सोलंकर,शिवराज पुकळे,महेश पाटणे,नंदकुमार गावडे ,भैय्या तरंगे यांच्या हस्ते करण्यात आले सांगोला येथील रेवनील रक्तपेढीने करत संकलन केले.
यावेळी स्वाभिमानी युवा मंचचे मार्गदर्शक सत्यवान आबा हांडे, संस्थापक शुभम तोडकर,जिगर ग्रुपचे औदुंबर लेंगरे,मयुर वाघमोडे,रोहित सरक,धनाजी दोलतोडे-पाटील,विजय वाघमोडे,ओंकार कोयले,किरण वाघमोडे,रुशी गरड,सुरज लिंगे,लक्ष्मण जगताप आदी उपस्थित होते.
Tags
सोलापूर