ऑडिओ रेकॉर्डिंग वरून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची मुद्रांक विक्रेत्या वर कारवाई



वाशी (शहाजी चेडे )- मोबाईल संभाषणाच्या  ऑडिओ रेकॉर्डिंग वरून  वाशी येथील  मुद्रांक विक्रेत्या वर आज लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून मुद्रांक विक्रेता अशोक चेडे याच्यावर वाशी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की तक्रारदाराच्या भावाची जमीन नावे खरेदीखत करण्यासाठी दुय्यम निबंधक वाशी या कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्री करणाऱ्या अशोक विनायक चेडे यांनी  २५ हजाराची मागणी केली होती आणि १८ हजार रुपयांमध्ये तडजोड झाली होती. ती रेकॉर्डिंग लाचलुचपत विभागाला सादर करण्यात आल्यानंतर लाचेची मागणी केली म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या देखरेखीखाली पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, विष्णु बेळे सिध्देश्वर तावस्कर आणि चालक करडे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post