कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही- चेअरमन समाधान आवताडेपंढरपूर:- कार्यक्षेत्रातील शेतक­याचा संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही असे मत चेअरमन समाधान आवताडे यांनी  आज श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम 2020-21 च्या उत्पादन झालेल्या तीन लाखाव्या साखर पोत्याचे पुजन व संचालक मंडळाची यशस्वीरित्या पाच वर्षे पूर्ण झालेबद्दल कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या सपत्नीक सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.शनिवार दि.20.2.2021 रोजी सकाळी 10.00 वा.  साखर पोत्यांचे पूजन चेअरमन समाधान आवताडे यांचे शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी व मार्गदर्शक संचालक बबनराव आवताडे यांचे प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
आपल्या भाषणात बोलताना चेअरमन समाधान आवताडे म्हणाले की, चालु गाळप हंगामात अत्यंत कमी कालावधीत चांगले गाळप झाले आहे. चालु गाळप हंगामात कमीत कमी खर्चात कामकाज होवून कारखाना सुरळीत चालु असलेने सर्व कर्मचा­यांचे अभिनंदन केले. आज तीन लाख साखर पोत्याचे पुजन झाले असुन कारखाना सत्तेवर आलेपासून असे नवीन प्रयोग केलेले आहेत. आपले आसपासचे कारखाने असतील काही को-ऑपरेटिव्ह असतील सध्या असणारी सरकारी ध्येय धोरणे, असंख्य संकटे यातुन साखर कारखाने चालविणे जिकीरीचे झालेले आहे. चालु वर्षी आपले सहा लाख मे.टनाचे गाळपाचे उद्दिष्ट होते परंतु ऊसाचे हेक्टरी टनेच फारच कमी झाल्यामुळे ते पूर्ण होवू शकत नाही.
  कामगारांनी संस्थेसाठी मोठे योगदान दिले असुन संस्थेवर कोणताही जादा बोजा पडणार नाही याचा विचार करुन प्रत्येक कामगारांना हुद्दा देण्याचा आमच्या संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. कामगारांना कामाप्रमाणे हुद्दा देताना यामध्ये कोणतेही राजकारण न करता ज्या कर्मचा­यांनी चांगले काम केले आहे त्यांना न्याय देणार आहे.  येणा­या काही दिवसामध्ये ब­यापैकी पगाराचा मुद्दा संपणार आहे.दुष्काळामध्ये कामगारांनी चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. त्यामुळे कारखाना एफ.आर.पी.,शेतक­यांची ऊस बिले व वहातुकीची बिले देवू शकलो. आतापर्यंत असा सत्काराचा योग 25 वर्षात एकदाही आलेला नाही. साखरपोती पुजनाच्या कार्यक्रमानिमित्त संचालक पती पत्नी यांचा सत्कार केलेला असुन हा उपक्रम खरंच चांगला आहे.  याबद्दल मी ऋणी आहे. संस्थेचे विकले जाणारे ऑन लाईन स्क्रॅप विक्रीमध्ये कारखान्याचा फायदा केला असून आतापर्यंत संस्थेच्या हिताची जबाबदारी पार पाडलेली आहे. सभासद,कामगार,वहातुकदार यांचे हित डोळयासमोर ठेवून कारभार केला जात असून भविष्यातही चांगले काम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात स्वागत कार्यकारी संचालक झुंजार आसबे म्हणाले की  संचालक मंडळाचे मार्गदर्शनानुसार आपण चालु हंगाम अडचणीवर मात करीत गाळप सुरु केलेला आहे.  कारखान्याच्या इतिहासात प्रथमच संचालक मंडळांनी पाच वर्षेचा कार्यकाल पुर्ण केलेला आहे.  कोरोनाचे प्रभावामुळे त्यांना आणखीन चार-सहा  महिने कामकाज करणेस मिळणार आहे. पाच वर्षे कारखाना सुरळीत चालवून अत्यंत काटकसरीचा कारभार व योग्य नियोजन केले आहे.े दामाजीचा कामगार हा पूर्ण ताकदीने व मनाने कारखान्यावर प्रेम करीत आहे. असंख्य आर्थि अडचणी आल्या परंतु त्यावर मात करीत कामगारांनी 40 ते 60 टक्के पगारावर कामकाज केले हे महाराष्ट्रातील कारखानदारीतील संत दामाजी कारखाना हा एकमेव उदाहरण आहे.कामगारांचे प्रलंबित असलेल्या कामाबाबत त्यांना लवकरच चेअरमनसाहेब न्याय देतील असे म्हणाले.
शिवसेना माजी तालुकाध्यक्ष प्रा.येताळा भगत म्हणाले की, आपले संचालक मंडळ खरचं भाग्यवान आहे.  त्यांनी सलग पाच वर्षे कामकाज केले. परंतु त्यांना पूर्ण क्षमतेने गाळप करता आले नाही.  सहा लाख पोत्याचे पूजन करता आले पाहिजे म्हणजे कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला पाहिजे. आपल्या अवती भवती पर्यायी कारखाने आहेत त्यामुळे गाळप कमी झालेले आहे. आपला कारखाना सहकारी कारखाना असल्यामुळे आपल्या बरोबरीने खाजगी कारखान्यांना दर दयावा लागतो.  कर्मचारी यांचे कोणतेही देणे राहणार नाही. कारखान्याने सायलो बसविल्यामुळे कारखान्यास फायदा झालेला आहे. दामाजीचा कामगार हा संयमी असुन त्यांना धन्यवाद दयावे लागतील. सभासद,कामगार,वाहतुकदार यांना संचालक मंडळांनी चागली वागणुक दिली.  शेती विभागाने ऊस लागवड धोरण बदलले पाहिजे म्हणजे सुधारित जातीची लागवड कराव्यात यासाठी जनजागरण करावे.  त्यासाठी को.86032 व 8005 या जातीचा ऊस लागण करावा.  दामाजीच्या 27 हजार सभासदांना मतदान अधिकार काढून घेण्याचा संचालक मंडळ प्रयत्न करीत नाहीत.  शासनाने ठरवून दिलेल्या 97 व्या घटना दुरुस्तीच्या ध्येय धोरणानुसारच तरतुद करीत आहेत.
कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे बोलताना म्हणाले की, साखर पोती पुजनाबरोबर संचालक मंडळाचा सत्कार हा कामगारांकडून झालेला असुन  संत दामाजी बरोबर विठ्ठलाची मुर्ती देवुन दोन्ही तालुक्याची जबाबदारी घ्यावी असे सुचित केलेचे वाटते.  पाच वर्षात काम करीत असताना गाळप कमी झाले त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढले.  कारखान्यात पाच वर्षत अपेक्षित काम करावयाचे होते ते करु शकलो नाही.आम्ही थोडे दु:खी आहे. आपले चेअरमनसाहे काटकसर करतात. आम्ही पाच वर्षामध्ये जाहिरातीस पूर्णपणे पायबंद घातलेला आहे. प्रत्येक बाबतीत काटकसर संचालक मंडळाने केलेला असुन कारखान्याचा फायदा करण्याचा प्रयत्न केलेला आहे..  आर्थिक परिस्थितीप्रमाणे वेळोवेळी निर्णय घ्यावे लागले आहेत. समाधान दादानी प्रत्येकाच्या असणाऱ्या गरजा भागविण्याचा प्रयत्न केला. आमचा सन 2026 ला पुन्हा  असाच सत्कार करा अशी भावना व्यक्त केली.
कामगार पतसंस्थेचे संस्थापक प्रकाश पाटील म्हणाले की,आज हा आपला सुवर्णयोग आला आहे. पाच वर्षात अतिशय कठीण परिस्थितीत कारखाना चांगल्या प्रकारे चालविला. कामगारांना पगार वेळेत दिला. 25 वर्षामध्ये संचालक मंडळाचा कार्यकाल संपलेमुळे आतापर्यंत असा सत्कार कधीही केलेला नाही. बरेच दिवस कर्मचारी वेगवेगळया ठिकाणी कामकाज करीत आहेत त्यांना प्रत्येकास हुद्दा दयावा आणि कामगारांची राहिलेली देणी संपूर्णपणे दयावीत व पुढील पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा तुम्हीच निवडून यावे अशी भावना व्यक्त केली.
सोमनाथ वठारे म्हणाले की, आजपर्यंत अनेक संचालक मंडळ आले परंतु असा कार्यक्रम एकदाही झालेला नाही. आज कामगारांनी विदयमान संचालक मंडळाचा सहकुटुंब व सहपरिवार सत्काराचा कार्यक्रम केलेला आहे. चालु संचालक मंडळाने आजपर्यंत मोळी पुजन व बॉयलर प्रतिपादन कार्यक्रम माजी संचालक मंडळाच्या हस्ते करुन एक आदर्श उपक्रम राबविला आहे. आज साखर पोती पुजन, संचालक मंडळ सपत्नीक सत्कार व कार्यकारी संचालक यांचा वाढदिवस म्हणजे आज अमृत योग आला आहे.  कार्यकारी संचालक यांचे नांव झुंजार असलेने त्यांनी थेाडी झुंज दिली आमच्या चेह­यावर समाधान दिसल्याशिवाय राहणार नाही आणि कर्मचा­यांचे प्रश्न पूर्ण होतील अशी भावना व्यक्त केली.
कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड म्हणाले की, कोरोनामुळे मुदतवाढ मिळाल्याने संचाक मंंडळास पाच वर्षे पूर्ण काम करण्यास मिळाले. संचालक मंडळाने पाच वर्षात कारखाना व्यवस्थित चालविला. परंतु गेल्या पाच वर्षात अपेक्षेप्रमाणे गाळप करता आलेले नाही.  संचालक मंडळाने ऊस बील, वहातुक ठेकेदार बिले वेळेवर दिली.  कर्मचारी उपेक्षित राहल्यासारखे वाटते.  येथून पूढचे काळात कमी वेळेत कर्मचारी देणी दयावीत.  पगार,बोनस,रिटेशन,बक्षिस,वार्षिक वेतनवाढ याला प्राधान्य दयावा. तसेच कर्मचारी हुद्देवाढ करण्याचे हातात घेतले आहे ते पूर्ण करावे.  वेळेअभावी काही प्रकल्प अपूर्ण राहिले ते पूढे पूर्ण करावे. कोरोनामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत.  सभासद पुन्हा एकदा त्यांना अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी संधी देतील अशी आशा व्यक्त केली.
कारखान्याचे संचालक अशोक केदार म्हणाले की, आम्ही पाच वर्षाचा कालखंड पूर्ण केलेला आहे. पाच वर्षात साडे चार लाखाच्या पुढे कधीही गाळप झालेले नाही.  त्यामुळे साखर उत्पादन कमी झालेले आहे.  गतवर्षी इतर कारखाने बंद होते.  परंतु आपला दामाजी कारखाना चालु केलेला होता.  कारखान्यातील कामगार नेते व कामगार चांगले आहेत. आमच्या संचालक मंडळास त्यांनी पूर्णपणे सहकार्य केलेले आहे. आमच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आंदोलन, संप आणि उपोषण व मोर्चे कधीही झालेले नाहीत. यापूर्वी होत होते. आपला कारखाना हा फक्त साखर उत्पादन करतो. आपले शेजारील असणा­या सर्व कारखान्याकडे सर्व उत्पादने आहेत.  आपण संपूर्ण एफ.आर.पी. पूर्ण केलेली आहे. आपण सायलो प्रकल्प पूर्ण केल्यामुळे वार्षिक खर्चात रुपये साठ लाखाची बचत झाली आहे. आसवनी क्रकल्प अंतीम टप्प्यात मंजुरीस आहे. तो लवकरच पूर्ण होईल.लवरच  कर्मचा­यांचे प्रश्न सोडविणेसाठी चेअरमनसाहेब  प्रयत्न करणार आहेत. आता येणा­या पोटनिवडणुकीत समाधानदादा दामाजी चौकात बॅट घेवून उभे राहतील व पंढरपूरच्या दिशेने बॉल मारतील आणि कामगारांनी षटकार मारुन तो एकाच चेंडून विधानसभेच्या दरवाज्याजवळ धडकला पाहिजे असे सांगितले.
    कार्यक्रमास भाजपा जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय जमदाडे, कारखान्याचे संचालक लक्ष्मण एकनाथ जगताप, राजीव सुब्रााव बाबर, राजेंद्र सर्जेराव पाटील, शिवयोग्याप्पा सायबण्णा पुजारी, बापू मधुकर काकेकर, बसवेश्वर शंकर पाटील, मारुती लिंगाप्पा थोरबोले, लक्ष्मण आमुंगी नरुटे, भुजंगराव मारुती आसबे, सुरेश बापू भाकरे, बबनराव बाबूराव आवताडे, सचिन गोपाळ शिवशरण, अशोक आण्णाप्पा केदार, सौ.स्मिता प्रमोदकुमार म्हमाणे, सौ. कविता भारत निकम, संजय सुब्रााव पवार यांचेसह ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, सिझन कामाचे कंत्राटदार, कामगार संघटना, पतसंंस्थेचे पदाधिकारी,कर्मचारी,शेतकरी उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार संचालक सचिन शिवशरण यांनी मांडले.

No comments:

Post a Comment