दैनिक जनमत : तासगावात रंगपंचमी दिवशीच दोन तरुणांच्या टोळक्यातील वादातून एका तरुणाचा भोकसून खून

Friday, April 2, 2021

तासगावात रंगपंचमी दिवशीच दोन तरुणांच्या टोळक्यातील वादातून एका तरुणाचा भोकसून खून


विटा नाका परिसरात घडली दुर्दैवी घटना भोसकून तरुण हल्लेखोर पसार

नूतन पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांचे समोर मोठे आव्हान

तासगाव प्रतिनिधी

      तासगाव शहरातील विटा नाका येथे आज सायंकाळी एकाचा भोकसून अमानुषपणे खून करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी हे कृत्य केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. या घटनेने विटा नाका परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या तिनं चार महिन्यांपासून दोन तरून टोळ्यांमध्ये वाद सुरू होता. या वादातून हे कृत्य झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे: सदरच्या तरुणांच्या टोळक्यातील वाद व भांडणे मारामारी यासंदर्भात तासगाव पोलिसांनी तातडीने त्यावेळेला पावले उचलून संबंधित तरुणांना पोलिसी खाक्या दाखवला असता तर आजचा हा प्रकार घडला नसता असे म्हटले तर वावगे ठरू नये यासंदर्भात तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्ती ही दत्त माळ परिसर इंदिरानगर झोपडपट्टी येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तासगाव शहरांमध्ये सध्या दररोज सांगली नाका परिसर विटा नाका परिसर येथे तरुणांच्या टोळक्यामध्ये वाद-विवाद व मारामारीच्या घटना सतत सुरू आहेत. दोन्ही परिसरामध्ये देशी दारूची दुकाने आहेत तसेच त्या परिसरामध्ये मटका खुलेआमपणे सुरू आहे. पोलिसांनी तातडीने या परिसरावर लक्ष ठेवणे काळाची गरज आहे. सर्वात महत्वाचे हाणामारीचे व अवैद्यधंद्याचे हॉटस्पॉट सांगली नाका परिसर आहे तरी पोलिस प्रशासनाचे या घटनेकडे दुर्लक्ष होत असून नूतन पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी आपला पॉलिसी खाकी दाखवावा अशी अपेक्षा तासगावकर नागरिक व्यक्त करीत आहेत. आज रंग पंचमी च्या पार्श्वभूमीवर दिवसाढवळ्या खूनासारखी तासगाव शहरातील लोक वस्तीतील घटना ही पोलीस असा पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची घटना मानली जाते आहे सदरचा खून हा अवैद्य व्यवसायातून झाला असल्याची दबक्या आवाजात तासगाव शहरातील नागरिकांच्या मते चर्चा सुरू आहे. तरी तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांनी तातडीने तासगाव शहरातील संपूर्ण अवैद्य धंदे त्यामध्ये खुले खुले आम मटका,जुगार, खुलेआम रात्रीचे होणारी वाळू चोरी इत्यादी घटनांमुळे तासगाव शहरांमध्ये टोळ्या झालेले आहेत. त्यामुळे सततच्या हाणामारी दादागिरी वादविवादाच्या घटना घडत असून.तातडीने सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी तासगाल शहरातील नागरिकांच्या कडून होत आहे.गेल्या दोन-तीन वर्षांपासून तासगाव पोलिस प्रशासनाचे या सर्वांकडे दुर्लक्ष झाले असून नूतन अधिकाऱ्याने यावर तातडीने कारवाई करून पोलिसांची झालेली मलीन प्रतिमा सुधारण्याचे  मोठे आवाहन तासगाव नूतन पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर आहे. दैनिक जनमत च्या २५ मार्च च्या अंकात नूतन पोलीस अधिकारी हजर होणार आहेत या बातमीच्या त्या संदर्भात तासगाव शहरात तरुणांच्या टोळक्याने चे वाद-विवाद व हाणामारीचे प्रकार सतत घडत असतात ही माहिती सदर अकांत दिली होती हे विशेष होय. तासगाव शहर व तालुका संवेदनशील तालुका असून लवकरच येत्या सहा महिन्यांमध्ये तासगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली असून महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीचे पावले उचलून पुढील घटना व अनर्थ टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.