अत्यावश्यक सेवा वगळून व्यापारपेठ बंद करण्याचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांचे आवाहन

 नूतन पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व पोलीस प्रशासन आणि नगरपालिका कर्मचारी रस्त्यावर.


अचानक व्यापारपेठ बंद करण्याने व्यापारी वर्ग नाराज संतप्त प्रतिक्रिया

तासगाव प्रतिनिधी

दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी वीकेण्डला लोक डाऊन करण्याचे आदेश दिले होते शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा वगळून लागवड करण्याचे आदेश दिले होते परंतु आज मंगळवारी सकाळी दहा वाजता तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील व नूतन पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व त्यांचा सर्व स्टाफ अचानक रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्याचे आव्हान करत होते.अचानक बंद करण्याचे सांगितल्यामुळे व्यापारी वर्ग मध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून नाराजी व्यक्त करीत व्यापारी वर्ग, छोटे उद्योग धंदे वाल्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत करताना दिसत आहेत.

आकडा संदर्भात शहरातील व्यापारी मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून प्रशासनाने योग्य ती सूचना देणे गरजेचे असल्याचे मोठे व्यापारी वर्ग व छोटे उद्योग धंदे व्यापारी बोलत आहेत.

यासंदर्भात तासगाव नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्यापारपेठ बंद करीत आहोत असे सांगितले आहे.

खरे वास्तविक दोन दिवसांसाठी लाॅकडाऊन असताना अचानक व्यापारपेठ बंद करण्याचे आव्हान करण्यात आले ने तासगाव शहरातील सर्व व्यापारी वर्गाने तासगाव नगरपालिका कडे धाव घेतली असून यासंदर्भात प्रशासन व व्यापारी यांच्यामध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. यासंदर्भात प्रशासन काय व्यापाऱ्यांना उत्तर देणार याकडे सर्व व्यापारी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:

Post a Comment