परंडा येथील सराफ अभिजित पेडगावकर यांच्या वर खंडणीचा गुन्हा दाखल



ब्लॅक मेल करून पत्रकार बागडे यांना मागीतली ५० हजारांची खंडणी

परंडा  दि.२२( प्रतिनिधी) परंडा येथील पत्रकार तथा सराफ दुकानदार सुरेश बागडे यांना ५० हजार रूपये दे अन्यथा तुला सोने चोरी प्रकरणाच्या खोटया गुन्हयात आडकवीन अशी धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या अभिजित हीरालाल पेडगावकर यांच्या विरुद्ध परंडा पोलिसात दि२२मे रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

        या बाबत परंडा पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की यातील आरोपी सराफ दुकानदार अभिजीत हिरालाल पेडगावकर ( दहिवाळ) हा दि २० मे रोजी रात्री ७ -३० ते ७-४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी सुरेश बागडे यांच्या घरी गेला व सोने  चोरी प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी मला अटक केली होती याची माहिती तुच दिली होती त्या मुळे माझे खुप नुकसान झाले आहे.उत्तर प्रदेश च्या केस मध्ये माझा झालेला सर्व खर्च दे मला अत्ताच्या अत्ता ५० हजार रुपये दे नसता तुलाही सोने चोरीच्या गुन्ह्यात अडकवीन व तुझा गेम करीन तुझ्या घरच्यांना देखील माहित पडणार नाही अशी धमकी दिली . 

        महाराष्ट्रातील च नाही तर बाहेरील राज्यातील मोठ मोठे गुन्हेगार तसेच पोलिस,मंत्री माझ्या ओळखीचे आहेत. सोन्याच्या धंदयामधला मी डॉन आहे तुझा गेम करीन अशी धमकी दिली 

          दि२०मे रोजी यातील फिर्यादी सुरेश बागडे यांच्या फिर्यादी वरून आरोपी अभिजित पेंडगावकर यांच्या वर भादवी कलम ३८४,४५२,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राजकुमार ससाने हे करीत आहे.

No comments:

Post a Comment