दैनिक जनमत : सांगली जिल्ह्यातील तेरा रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार सुविधा

Monday, May 24, 2021

सांगली जिल्ह्यातील तेरा रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार सुविधाजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती


तासगाव/ सांगली प्रतिनिधी


 सद्यस्थितीत  म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या आजाराचे रुग्ण वाढत आहेत . सदर आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी  सांगली जिल्ह्यातील शासकीय व खाजगी अशा एकुण १३ रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा सुरु करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.   

यामध्ये महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत म्युकरमायकोससिस (ब्लॅक फंगस) झालेल्या रुग्णांवर पुढील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. १) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरज, २)सेवा सदन हॉस्पिटल, मिरज,३)वॉनलेस हॉस्पिटल,मिरज, ४) भारती हॉस्पिटल, मिरज येथे उपचार करण्यात येतील. 

तर खाजगी रुग्णालय पुढील प्रमाणे आहेत. १) परमशेट्टी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज, २) डॉ. सुरज तांबोळी, तांबोळी हॉस्पिटल,मिरज, ३) डॉ. महेश शह, सर्वहित हॉस्पिटल, जिल्हा परिषदेसमोर, सांगली, ४) डॉ. वासीम मुजावर, सिटी सुपरस्पेशालिटी, हॉस्पिटल, गुलमोहोर कॉलनी, सांगली, ५) डॉ. आलोक नरदे, ओम हॉस्पिटल, विटा ६) डॉ. जी.एस.कुलकर्णी, श्रध्दा सर्जिकल ॲन्ड ॲक्सीडेंट हॉस्पिटल, सिव्हील हॉस्पिटल, जवळ, सांगली, ७) डॉ. शिशिर गोसावी, अश्विनी प्रसाद हॉस्पिटल, मिरज, ८)डॉ. शरद भोमाज,शांतीसरोज नेत्रालय, मिरज, ९) डॉ. सुधीर कदम, यशश्री हॉस्पिटल, मिरज


या आजारावर उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये वाढ झाल्यास प्रशासनातर्फे वेळोवेळी कळविण्यात येईल.


महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये रुग्णालयात दाखल करताना नागरिकांनी आधार कार्ड व रेशन कार्डचे प्रत स्वतःजवळ ठेवून रुग्णालयास उपलब्ध करून दिल्यास उपचार अधिक सुसह्य होईल.