दैनिक जनमत : शिवसेनेचे तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव मारहान प्रकरणी ११ शिवसैनिकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Saturday, July 24, 2021

शिवसेनेचे तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव मारहान प्रकरणी ११ शिवसैनिकावर गुन्हा दाखल


परंडा प्रतिनिधी भजनदास गुडे.( दि २४ )  शिवसेनेचे तालूका प्रमुख आण्णासाहेब जाधव यांना मारहान केल्या प्रकरणी ११ शिवसैनीका विरुध्द दि २३ जुलै  रोजी परंडा पोलिसात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         दि १७ जुलै रोजी तालूक्यातील आसू येथून शिवसंपर्क आभियान सुरू करण्यात आले होते या  शिवसंपर्क अभियानाच्या बॅनरवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो नसल्याने यातील आरोपींनी दि २० जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सोनारी रोड वरील पेट्रोल पंपा जवळ स्कारपीओ गाडीत येऊन लाठ्या,काठया,बांबुने मारहान करण्यात आली असल्याची फिर्याद आण्णासाहेब जाधव यांनी परंडा पोलीस स्टेशनला दिल्याने या प्रकरणातील आरोपी युवराज ढोरे,विशाल गिलबीले,महाविर जगताप,योगेश वाघमोडे दत्ता मेहेर,प्रशांत गायकवाड,राजा गायकवाड,रेवण ढोरे,हनुमंत ढोरे, बुद्धीवान ढोरे,आभिजीत पाटील , यांच्या विरूद्ध ३०७,३२४,३२३, १४३,१४७,१४८,१४९,५०४, ५०६ कलमानुसार ११जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील ९ आरोपी शिराळा येथील तर दोन आरोपी परंडा येथील आहेत

      या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे हे करीत आहेत..