नागरिकांसहीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचा प्रखर विरोध
सत्ताधारी भाजप विरोधात सर्व पक्ष व नागरिक एकवटणार बेकायदेशीर ठराव हाणून पाडणार
तासगाव प्रतिनिधी/ राहुल कांबळे
तासगाव शहरामध्ये प्रशासकीय इमारती कडील रस्त्यावर क्रीडा संकुल असून त्यालगत एक सुंदर फुटपाथ बांधण्यात आला आहे. त्या फूटपाथवर ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिक व महिला सायंकाळी व्यायामासाठी येत असतात तेथे लावण्यात आलेल्या झाडाच्या सावलीखाली नागरिक विश्रांती घेत असतात, तेथे एक शाळा आहे हा सदरचा रस्ता दीडशे दोनशे मीटर प्रशस्त आहे. पुढे वृंदावन कॉलनी असून त्या फुटपाथवर पालिकेने १५ लाख रुपये खर्चून सुशोभीकरण केले आहे परंतु तासगाव नगरपालिकेतील भाजपचे सत्ता सत्ताधारी मंडळींनी चार पाच महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऐन वेळच्या विषयात हा विषय घुसडूण त्या सुंदर फुटपाथवर दहा फूट लांबी-रुंदीचे पत्र्याचे तीस ते पस्तीस गाळे बनवण्याचा घाट घातला आहे त्या फुटपाथवर चार दिवसापूर्वी खोक्याचे मार्किंग ही करण्यात आले आहे त्या वेळी स्थानिक नागरिक व विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते खडबडून जागे झाले आहेत काँग्रेसने तर नगरपालिकेत तक्रार दाखल करीत तालुका अध्यक्ष महादेव पाटील, रवी शेठ साळुंखे अजय पवार शरद शेळके यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे ३०८ दाखल करण्याची तयारी केली आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव नगरपालिकेतील गटनेते नगरसेवक बाळासाहेब सावंत, अभिजीत माळी, तानाजी पवार वैभव भाट,शहराध्यक्ष एॅड.गजानन खुजट, अभिजीत पाटील, कमलेश तांबेकर अमित पवार स्वप्नील जाधव, राहुल शिंदे,अक्षय धाबुगडे,सौ नलिनी पवार शुभांगी साळुंखे सौ पुनम माळी व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, शहरप्रमुख संजय दाजी चव्हाण, विशाल शिंदे, सुशांत पैलवान, कृष्णा म्हेत्रे व राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी क्रीडा संकुलाला लागत असलेल्या फुटपाथवरच शनिवारी सायंकाळी एकत्र येत आपल्या त्या खोक्यांना असलेल्या विरोधाची भूमिका स्पष्ट केली आहे.सदरचा ठराव रद्द न केल्यास एकत्रित होऊन तासगाव नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी क्रीडा संकुल शेजारी असलेल्या वृंदावन कॉलनीतील नागरिक बापू धोत्रे, रंगा बापू धोत्रे,नारायण धोत्रे रघुनाथ पाटील, फाळके साहेब, इत्यादी सह नागरिक उपस्थित होते.मुळात हा सुशोभित केलेला फुटपाथ पालिकेच्या मालकीचा आहे किंवा क्रीडा संकुलाचा भाग आहे हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे सत्ताधारी मंडळी चे म्हणणे आहे की ही जागा पालिकेची असून तेथे बोंड राईटर,अपंग व्यक्ती,आर्थिक दुर्बल घटक असणाऱ्या तरुणांना रोजगारासाठी हे गाळे बांधणार असल्याचे थातुरमातुर उत्तर देण्यात येत आहे मुळात शहरात पालिकेचे मालकीचे अनेक शेकडो गाळे धूळ खात पडतात पडून असून अनेक जागा विकसित न करता पडून आहेत उदा. सांगली नाका येथील म्हेत्तर वसाहत त्याकडे मात्र पालिकेच्या सत्ताधारी मंडळींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे परंतु चांगल्या स्वच्छ व सुंदर फुटपाथवर गाळे बांधून पालिकेचे उत्पन्न वाढणार आहे की ठेकेदाराचे उखळ पांढरे करणार आहेत हा विषया बद्दल तासगावात नागरिकांच्या मध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. परंतु या गाळ्याना मात्र भाजप सोडून सर्व पक्षांचा व नागरिकांचा प्रखर विरोध असून पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना सत्ताधारी मंडळींना सुचलेली ही दुर्बुद्धी आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी या फुटपाथवरच पत्रकार परिषद घेत आपली तीव्र विरोधाची भूमिका स्पष्ट केली असून यात आमदार सुमनताई पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे ज्या उद्देशाने स्वर्गीय आर आर आबा पाटील यांनी क्रीडा संकुल उभे केले आहे त्या क्रीडा संकुलाच्या बाहेर बेकायदेशीरपणे गाळे उभा करून मूळ उद्देशात भाजपची सत्ताधारी मंडळी बहुमताच्या जोरावर हरताळ फासू पाहात आहेत परंतु त्यास सुरु असलेला तीव्र विरोध पाहता आहे ही चालू असलेली ठेकेदारी पोसण्याचे कटकारस्थान सत्ताधारी भाजपची भूमिका तासगाव शहरातील सुज्ञ नागरिक हाणून पडल्याशिवाय राहणार नाहीत सत्ताधारी पक्षाचे नेते खासदार संजय काका पाटील हे नागरिकांचा विरोध असलेल्या कामाला स्थगिती देणार का व सत्ताधारी नगरसेवक मंडळींचे कान उपटणार की नाही याकडे तासगाव शहरातील सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित दादा पाटील यांनी लक्ष घातल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यासंदर्भात लवकरच ते मा. जिल्हाधिकारी सांगली व पालक मंत्री यांना शिष्टमंडळासह भेटणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.