कुंडल (प्रतिनिधी)
दुधोंडी (वसंतनगर)ता.पलूस येथे शाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याच्या वादातून झालेल्या मारामारीत सनी आत्माराम मोहीते ( वय 27),अरविंद बाबूराव साठे (वय 45 ),विकास आत्माराम मोहीते (वय 32)सर्व रा.दुधोंडी या तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला.तसेच संग्राम विकास मोहीते (वय 17),आकाश आत्माराम मोहीते (वय 28),दिलीप आनंदा साठे (वय 42) सर्वजण राहणार दुधोंडी,ता.पलूस या जखमींना शासकीय रूग्णालय,सांगली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत कुंडल पोलीसांतून मिळालेली माहीती अशी,शनिवार दिनांक 31 जुलै 2021 रोजी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यावरून दोन गटात किरकोळ वाद झाला होता. या वादाची खोटी तक्रार कुंडल पोलीसांत का दिली या कारणांवरून आज दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान संशयित आरोपी प्रविण विलास मोहीते,अदित्य विलास मोहीते,हिम्मत मधुकर मोहीते, विजय मधूकर मोहीते,किशोर प्रकाश मोहीते, वनिता विलास मोहीते,संगिता मधुकर मोहीते,मधूकर धोंडीराम मोहीते यांनी आमच्याच लोकांना तुम्ही मारहाण करून खोटी तक्रार का दिली असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली.या झालेल्या मारामारीत संशयित आरोपींनी धारदार शस्रे,लोखंडी पाईप,काठ्या घेत तुम्हाला मस्ती आहे.आता जिवंत सोडणार नाही असे म्हणत मारहाण करण्यास सुरूवात केली.यातील सनी मोहीते,अरविंद साठे,विकास मोहीते यांच्या छाती,पोटावर धारदार शस्त्रांचे वर्मी घाव लागल्याने मोठ्या प्रमाणात अतिरक्तस्राव झाल्याने आरोपींनी पलायन केले.सर्व जखमींना स्वप्निल साठे व त्यांच्या मित्र,नातेवाईकांनी दुचाकीवरून पलूस येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधिका-यांनी प्राथमिक उपचार करून सांगली येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले.मात्र सनी आत्माराम मोहीते, अरविंद बाबूराव साठे,विकास आत्माराम मोहीते यांच्या पोटावर, छातीवर धारदार शस्त्रांचे वर्मी घाव लागून अतिरक्त स्राव झाल्याने मयत झाल्याचे वैद्यकिय अधिका-यांनी सांगितले.तसेच इतर जखमींवर सांगली येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत स्वप्निल अरविंद साठे यांनी कुंडल पोलीसांत फिर्याद दिली आहे.संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
No comments:
Post a Comment