दैनिक जनमत : सावळजमध्ये स्वागत कमानीचा पायाभरणी शुभारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Friday, August 20, 2021

सावळजमध्ये स्वागत कमानीचा पायाभरणी शुभारंभ उत्साहात संपन्न



आ. सुमनताई पाटील व खा. संजयकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती ;विकासकामांसाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन

तासगांव  प्रतिनिधी

तासगाव तालुक्यातील सावळज येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या नियोजित नवीन स्वागत कमानीचा पायाभरणी शुभारंभ खा. संजयकाका पाटील व आ. सुमनताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पायाभरणी शुभारंभ करण्यात आला.सावळज गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन यावेळी आमदार व खासदारानी सावळज ग्रामस्थांना दिले.

यावेळी सरपंच स्वाती(ताई) पोळ, उपसरपंच संजय थोरात,जि.प. सदस्य सागर पाटील, जयवंत सदामते, ग्रामपंचायत सदस्य अविनाश म्हेत्रे, ऋषीकेश बिरणे, योगेश पाटील,विनोद कोळी,कल्पना बुधवले,अनिता भडके, रमेश कांबळे, कल्पना धेंडे, सुमन चव्हाण, संजय बुधवले, सोमनाथ कांबळे,माजी सरपंच हेमंत पाटील,मा. सरपंच नितिन तारळेकर, मा. सरपंच पांडुरंग भडके. माजी जि. प. सदस्य किशोर उनउने,व्हा. चेअरमन अनिल थोरात, पोलिस पाटील सुजाता बागवडे, दत्ता केडगे,अमोल पोळ,संदिप पाटील, नागेश सुतार, विजय चव्हाण,संजय पोळ,सागर थोरात , महादेव चिवटे, गणेश पाटील,रवींद्र शिंदे , गणेश चिवटे,अमोल लिगाडे,सचिन देसाई, ॲड. विजय धेंडे,ॲड. मिलिंद झेंडे , बाबा पाटील,शिदगौंड पाटील,प्रदीप फासे,जगु पाटील,अनिल शिंदे,जावी तांबोळी, नंदु देसाई,संजय सावळजकर,  बाबासाहेब पोळ,राजेंद्र पाटील, राजु कलाल यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

सावळज गावातील श्री सिध्देश्वर मंदीरासमोर सुमारे ३५० वर्षापूर्वीपासून ऐतिहासिक दगडी कमान होती. ती जुनी झाल्यामुळे धोकादायक बनली होती. तेंव्हा ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी गटतट बाजुला ठेवून गावाचा ऐतिहासिक वारसा जपण्याकरिता नवीन कमान बांधण्याचे नियोजन केले आहे.

सांगलीचे प्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्याकडून कमानीची ऐतिहासिक डिझाईन बनविण्यात आली आहे. कुमार कलगुटकी यांच्या अनुभवी टीमकडे नवीन कमानीचे बांधकामाची जबाबदारी देण्यात आली आहे. या भव्य स्वागत कमानीसाठी लोकवर्गणीतून निधी संकलीत केला जात आहे. अनेक दानशूर लोकानी यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांनी गावाच्या सौंदर्यात भर पडेल अशी दैदिप्यमान स्वागत कमान उभारण्याचे नियोजन केले आहे.

दरम्यान, स्वागत कमानीच्या पायाभरणी शुभारंभच्या निमित्ताने गटतट बाजुला ठेवून सर्व ग्रामस्थांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरात लवकर ही ऐतिहासिक स्वागत कमान पुर्ण करण्यासाठी सर्वजन प्रयत्नशील आहेत. या कामासाठी ग्रामस्थांनीही सढळ हाताने मदत करावी असे आवाहन स्वागत कमान ग्रामस्थ समितीने केले आहे.

तूर डाळीच्या साठ्यासंदर्भात देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केली समिती

  नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने, आयातदार, गिरणीमालक, साठेधारक आणि व्यापारी यांसारख्याकडे असलेल्या तूर डाळीच्या साठ्य...