गांधीनगर ( प्रतिनिधी )
पंचगंगेला आलेल्या महापुराच्या वेळी वीज वितरण कंपनीच्या उचगाव व गांधीनगर येथील कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून विजपुरवठा चालू केल्याबद्दल करवीर शिवसेनेनेच्या वतीने सलाम ठोकून सन्मान केला.
वीज वितरणचे उचगाव येथील कर्मचारी किरण कोळी, विशाल ठाकूर व गांधीनगर येथील कर्मचारी नितीन कांबळे, अमित चौगुले, अमित पवार, सुनील खटावकर, सुशील कांबळे या कर्मचाऱ्यांनी महापुराच्या पाण्यात उतरून विजेच्या पोलवर चढून अनुक्रमे उंचगाव व गांधीनगर येथील वीज पुरवठा पूर्ववत चालू केला. जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल तमाम जनतेच्या वतीने करवीर शिवसैनिकांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.
अशा धाडसी लोकसेवकांचा आदर्श सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केले. उचगावचे शाखा अभियंता रघुनाथ लाड व गांधीनगरचे शाखा अभियंता अतुल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरणच्या या सहा कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा करवीर पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही.
यावेळी युवासेनेचे विनायक जाधव, संतोष चौगुले, हिंदुत्ववादी शरद माळी, महेश खांडेकर, विभागप्रमुख वीरेंद्र भोपळे, विराग करी, महादेव चव्हाण, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटीळक व प्रफुल्ल घोरपडे, फेरीवाले संघटनेचे कैलास जाधव, दत्ता फराकटे, अजित चव्हाण, अजित पाटील, बंडा पाटील, दत्तात्रय विभुते, नितीन कांबळे यांनी उचगाव येथील वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.