दैनिक जनमत : शिक्षण सेवक सोसायटी लि.सांगली यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पुन्हा घ्या

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Sunday, August 8, 2021

शिक्षण सेवक सोसायटी लि.सांगली यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पुन्हा घ्या

 


महाराष्ट्र राज्य डी सी पी एस व एन पी एस संघर्ष समितीची मागणी


कुंडल (प्रतिनिधी).दिनांक 08/08/2021 रोजी शिक्षण सेवक सोसायटी ली. सांगली यांची ऑनलाईन यु ट्यूब द्वारे सर्वसाधारण सभा ठीक एक वाजता आयोजित करण्यात आली.

       या सभेत सोसायटीने साधारण एकूण 6000 सर्व सभासदांना  सात दिवस अगोदर निमंत्रण पत्रिका देण्यात आले होतेया सभेला नियमानुसार एकूण सभासद पैकी 600 सभासद उपस्थित असणे गरजेचे होते, पण त्यापैकी फक्त 302सभासद उपस्थित होते.कोरम पुर्ण झालेच नाहीच. आणि या सर्वसाधारण सभेत चेअरमन व संचालक यांनी,ऑनलाईन यू ट्यूब द्वारे आयत्या वेळेचे विषय,जादा खर्चाचा विषय, मागिल सभेचे विषय मांडले आणि कोणत्याच सभासदाचे म्हणणे न एकताच चेअरमन व संचालक यांनी  सर्व विषय पास करून घेतले,म्हणून सभेतील सर्व मंजुर विषय सभासदांच्या हितासाठी रद्द करावेत.

       त्यामुळें सांगली जिल्ह्यातील सर्व सभासदांनी व डी सी पी एस व एन पी एस  संघर्ष समितीचे खालील पदाधिकारी

जिल्हा कार्याध्यक्ष राजमाने सर,मनपा सचिव मकानदार सर,मनपा उपाध्यक्ष सूर्यवंशी सर,मनपा प्रमुख कलीम नदाफ सर,जिल्हा सदस्य मनोहर साबळे सर,जिल्हा उपाध्यक्ष राहूल जाधव सर,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख रोहित सोळवंडे सर,जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे,तसेच जिल्हा सदस्य संबाळे सर,कोळी सर,सावंत सर,जिल्हा सचिव उमेश घोसरवाडे सर,जिल्हा महिला प्रमुख,गुरव मॅडम,मिरज तालुका अध्यक्ष राजीव पारधी सर, उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण सर,महिला अध्यक्ष सुनिता शिंगाडे मॅडम, उपाध्यक्ष शिल्पा शिरद वाडे मॅडम,क. महांकाळ तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंजाळ सर,उपाध्यक्ष शरद कोळी सर, महिला उपाध्यक्ष स्मिता ओलेकर मॅडम,कार्याध्यक्ष अजित पाटील सर, सचिव शिवाजी कारंडे सर,प्रसिद्धी प्रमूख माणिक जाधव सर,तासगांव अध्यक्ष सूरज कुंभार सर,उपाध्यक्ष रामलाल कोकणी सर,पलूस अध्यक्ष राहूल मुंजा वर सर,उपाध्यक्ष समीर मुल्ला सर,जत अध्यक्ष विजय बुद्रुक सर, उपाध्यक्ष कोकणी सर,वाळवा अध्यक्ष भरत साळुंखे सर,शिराळा अध्यक्ष आसलम मुलाणी सर, उपाध्यक्ष दिपक पाटील सर, राज्य सहसचिव धनराज ठोंबरे सर इत्यादी सर्व पदाधिकऱ्यांनी हिष्कार टाकला आहे.

        त्यामुळे मा.चेअरमन व संचालक मंडळ यांनी पुन्हा सर्वसाधारण सभा घेण्यात यावी व पुढची तारीख घोषित करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती

 चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदा...