दैनिक जनमत : एकजुटीने काम करत राष्ट्रवादीला उस्मानाबाद जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष करुया - प्रा. सुरेश बिराजदार

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Tuesday, August 31, 2021

एकजुटीने काम करत राष्ट्रवादीला उस्मानाबाद जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष करुया - प्रा. सुरेश बिराजदार

 

तुळजापूर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यकारीणीच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्षांची सादउस्मानाबाद

जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या  येणाऱ्या आगामी  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे राष्ट्रवादीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

प्रसंगी बोलताना सुरेश बिराजदार यांनी देशाचे नेते माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार  यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात असून, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एकजुटीने एक दिलाने काम केले तर येणार्‍या काळात निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरणार आहे असे प्रतिपादन केले. व यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवावा व आपापल्या गावातील प्रत्येक बुथसाठी बुथ कमिटी स्थापन करण्याचे आवाहन केले.

यावेळी ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे,प्रदेश सचिव सुरेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल,संपत डोके, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, डॉ. प्रतापसिंह पाटील, महेंद्र दुरगुडे, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ  शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा मगर,अशोक जाधव जिल्हा उपाध्यक्ष वाजीद पठाण,जगदीश पाटील जिल्हा कोषाध्यक्ष,तुषार वाघमारे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख,गौस तांबोळी जिल्हा सचिव,सतीश एकंडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, सचिन तावडे उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष उस्मानाबाद, श्याम घोगरे तालुका अध्यक्ष उस्मानाबाद,दत्ता इंगळे जिल्हा चिटणीस, मुस्ताक कुरेशी जिल्हा सरचिटणीस, इलियास पिरजादे,सुनंदा भोसले सा.न्याय वि.जिल्हाध्यक्षविवेक घोगरे, सईद काझी , उत्तमराव लोमटे,राजकुमार भगत, संजय पाटील,, अमर चोपदार शहराध्यक्ष तुळजापूर, सचिन कदम जिल्हा उपाध्यक्ष युवक, विवेक शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष, शेख तोफिक अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष, विवेक शिंदे, सागर चव्हाण, नानासाहेब जमदाडे तालुका कार्याध्यक्ष, महेश नलावडे, दर्शना बचुटे सा. न्याय, ज्योती माळे ता. अध्यक्ष,  सलमा सौदागर अल्प संख्यांक ता. अध्यक्ष कळंब, बालाश्री पवार, मोहन जाधव जिल्हा उपाध्यक्ष युवक उस्मानाबाद, खलील पठाण अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष, विशाल शिंगाडे सां. वी जिल्हाध्यक्ष, बाळासाहेब स्वामी ओबीसी जिल्हा अध्यक्ष, राजेंद्र गायकवाड सा. वि, श्रीधर भवर तालुका अध्यक्ष कळम,विजय लोमटे विधानसभा अध्यक्ष लोहारा, सुनील साळुंखे लोहारा तालुका अध्यक्ष, बबन गावडे तालुका संघटक, अनमोल शिंदे ,दिनेश शिरसागर, विकी घुगे ,रोहित चव्हाण, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती

 चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदा...