23 वर्षाखालील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर

उस्मानाबाद

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित इंदापुर येथे होणाऱ्या 23 वर्षाखालील फ्रिस्टाईल व ग्रीकोरोमन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी तुळजाभवानी क्रिडा संकुल उस्मानाबाद येथे विभागीय सचिव पै . वामनराव गाते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील 19 ते 23 वयोगटातील कुस्तीगीर सहभागी झाले होते. 1992चे महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख सोलापुर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभाहस्ते हनुमान प्रतिमा पुजन करून स्पर्धेला सुरुवास झाली. स्पर्धेत अटीतटीच्या झालेल्या लढतीत खालील कुस्तीगीर वजननिहाय विजयी  झाले. विजयी कुस्तीगीर दि 4 ते 5 सप्टेंबर इंदापुर येथे होणार्‍या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हयाचे नेतृत्व करणार आहेत.

 फ्रिस्टाईल कुस्ती विभाग

57kg - रोहीत भोसले येडशी, 61kg - प्रणव बहीर - पारगांव 65kg- पृथ्वीराज तुगावे - व्होर्टी, 70kg - सत्यप्रकाश नरवटे उमरगा 74Kg - इम्रान शेख अंबेजवळगा, 79kg - कुणाल देवकर परंडा, 86kg - हर्षवधन लोमटे  परंडा, 92kg - दिपक पाटील सोनारी, 97kg - रितेश भगत परंडा, 125kg विकास गटकळ भूम या पैलवानांनी जिल्हास्तरीय फ्रिस्टाईल कुस्ती प्रकारात यश संपादन केले असून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे

 ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात

 55kg - शंभू रोकडे नितळी, 60kg सागर शिंदे जागजी, 63kg खंडू माने नितळी, 67kg  शुभम शिंदे तेरखेडा, 72kg ऋषिकेश गाडे व्होर्टी, 77kg योगेश साळुंखे भूम, मनोज जाधवर उस्मानाबाद , 87kg भगवान मदने परंडा, 97kg सौरभ बाराते भूम ,125 kg धीरज बारस्कर परंडा यांनी यश संपादन केले असून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या प्रसंगी उदय काकडे, दिनकर जाधवर, बालाजी हलकरे, तात्यासाहेब बहीर, बाळासाहेब शिंदे, बबलू दणके ,सुंदर जवळगे चॉद सय्यद शिवाजी काळे यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून बालाजी बुरंगे ,गोविंद घारगे,गणेश सापते, रामेश्वर कार्ले, खरमाटे सर आकाश भोसले  यांनी काम पाहिले . सर्व मान्यवरांनी निवड झालेल्या कुस्तीगीरांना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या 

Post a Comment

Previous Post Next Post