दैनिक जनमत : १ सप्टेंबर ते ३१ सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात पोषण महिना साजरा होणार - अस्मिता कांबळे

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Wednesday, September 1, 2021

१ सप्टेंबर ते ३१ सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात पोषण महिना साजरा होणार - अस्मिता कांबळेउस्मानाबाद - जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ सप्टेंबर पर्यंत पोषण महिना साजरा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी एच निपाणीकर, डॉ. उज्वला कळंबे आदि उपस्थित होते.

सुपोषित भारत" या संकल्पनेवर आधारीत शासनाच्या महिला बालकल्याण, आरोग्य, शिक्षण,ग्रामपंचायत, कृषी, पाणीपुरवठा, MSRLM या विविध विभागामध्ये अभिसरण पध्दतीने पोषण अभियान कार्यक्रम देश पातळीवर राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सप्टेंबर २०२१ हा संपूर्ण महिना "राष्ट्रीय पोषण महिना” म्हणून साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात या पोषण माह मध्ये विविध विभागामार्फत विविध उपक्रम घेतले जाणार आहेत व याद्वारे आरोग्य व पोषणासंदर्भात लोकांमध्ये योग्य दृष्टीकोन व जनबदल करणे व लोकांमध्ये चांगल्या पोषणाच्या सवयी निर्माण करण्यासाठी एक व्यापक जन आंदोलन निर्माण करणे हा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यामागे प्रमुख उद्देश आहे . पोषण महिना मध्ये कोविड-१९ च्या मार्गदर्शिक सुचानांचे पालन करून खालील उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.


पहिला आठवडा (१ ते ७ सप्टेंबर २०२१) - थीम १ :- पोषण वाटिका तयार करणे

१. गावस्तरावर पोषण रॅली काढून शुभारंभ

२. अंगणवाडी केंद्र , शाळा, उपकेंद्र, ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक जागेवर पोषण वाटिका तयार

करणे

३. MSRLM मार्फत गावस्तरावर परसबाग संदर्भात मार्गदर्शन व प्रात्यक्षिके

४. पोषण वाटिका / पोषण बाग स्पर्धेचे आयोजन

५. कोविड लसिकरणाबाबत जनजागृती

६. मातृ वंदना सप्ताह साजरा करणे

दुसरा आठवडा (८ ते १५ सप्टेंबर २०२१) – थीम २:- पौष्टियकतेसाठी योग आणि आयुष

१. अंगणवाडी स्तर,शाळा,उपकेंद्रे,आणि ग्राम पंचायत स्तरावर स्तनदा माता, गरोदर महिला,किशोरवयीन मुली यांचे करिता आयुष विभागामार्फत योग सत्रांचे आयोजन करणे

२. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे १००% कोविड लसीकरण

३. गर्भवती महिला व स्तनदा माता साठी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन

४. अॅनेमिया मुक्त भारताच्या अनुषंगाने गर्भवती महिलासाठी अॅनेमिया तपासणी व उपचार समुपदेशन

५. तिसऱ्या तिमाहीतील गर्भवती महिलासाठी प्रसूती नंतर एका तासाच्या आत स्तनपान या विषयावर online मार्गदर्शन

६. गर्भवती महिला व किशोरीमुली साठी ग्रहभेटीच्या माध्यमातून पोषण आहारातून आणि लोह फोलिक अॅसिड च्या सेवनाबद्दल समुपदेशन

७. प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये किशोरवयीन मुलींना IFA tablet चे वाटप व सेवनाचे मार्गदर्शन

८. शासकीय व अशासकीय कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी-५ मिनिटे योगा प्रोटोकॉल प्रशिक्षण-

 तिसरा आठवडा (१६ ते २३ सप्टेंबर २०२१) -

१. १००% लाभार्थ्याचे तरंग सुपोषित महाराष्ट्र या पोर्टल वरती रजिस्ट्रेशन व जनजागृती

२. पोषण आहार पाककृतीचे अंगणवाडी सेविकमार्फत लाभार्थ्यांना प्रशिक्षण व पाककृती स्पर्धेचे आयोजन (स्थानिक उपलब्ध पोषक अन्नधान्याचे पाककृतीचे गाव स्तरावर प्रदर्शन)

३. जल जीवन मिशन अंतर्गत १००% अंगणवाडी व शाळांना नळ कनेक्शन देणे

चौथा आठवडा (२४ ते ३० सप्टेंबर २०२१) -

१. अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करून बालकांना संदर्भ सेवा व उपचार करणे

२. गर्भवती महिला किशोरी मुली यांच्या साठी आरोग्य व पोषण संदर्भात अंगणवाडी शाळास्तरावर प्रश्नमंजुषा, निबंध,पोस्टर यासारख्या स्पर्धेचे आयोजन करणे

३. माझे मुल माझी जबाबदारीच्या अनुषंगाने कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या मुलांची तपासणी व उपचार

४. महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत महिला सक्षमीकरण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करणे

५. कृषी विभागामार्फत सेंद्रिय पालेभाज्या, फळभाज्या व पिकांचे महत्व व उत्पादन या विषयी ग्रामस्तरावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

६. उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव