उस्मानाबाद बसस्थानकात बेवारस वृद्ध महिलेचा मृत्यू

 


उस्मानाबाद - येथील बसस्थानकात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला असून घटनास्थळी आनंद नगर पोलीस दाखल झाले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद बसस्थानकातील बंद असलेल्या रसवंती शेजारील   फलाट क्रमांक ३ वर वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. आज दुपारी चार वा. च्या दरम्यान मृत्यू झाल्यानंतर याची खबर स्थानक प्रशासनाने पोलिसांना दिली. या महिलेचे वय अंदाजे ७५ असून चार पाच दिवसांपूर्वी त्याना कोणी तरी सोडून गेले असल्याचे नेहमी प्रवास करणारे प्रवासी सांगतात. मृतदेहाजवळ कोणतीही पिशवी अथवा साहित्य आढळून न आल्याने ओळख पटवणे अवघड आहे. आनंद नगरचे सपोनि तुकाराम शिंदे आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.  रुग्णवाहिकेतून मृतदेह शासकीय रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी नेला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post