पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या निधीसाठी समिती सदस्यसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटणार: दत्तात्रय भरणे

 


 

            सोलापूरदि.3: येथील  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा आणि स्मारक निर्मितीसाठी एकूण नऊ कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता आहे . त्यातील दोन कोटी रुपये निधी विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. उर्वरित सात कोटी रुपये  निधीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुढील आठवड्यात समिती सदस्यांसह भेट घेण्याचा निर्णय स्मारक समिती सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली .

            येथील नियोजन भवन येथे पालकमंत्री तथा स्मारक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सदस्यांची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते .या बैठकीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू तथा स्मारक समितीच्या कार्याध्यक्षा डॉ. मृणालिनी फडणवीसजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरमहापालिका आयुक्त पी. शिवशंकरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीपोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेपोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडूकर यांच्यासह समितीचे सदस्य बाळासाहेब शेळकेचेतन नरोटेआदित्य फत्तेपुरकरडॉ. अनिकेत देशमुखगेना दोडतलेश्रावण भवरबाळासाहेब बंडगरअस्मिता गायकवाडॲड. सुचेता व्हनकळसेप्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे आदी उपस्थित होते .

            कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठात साकारण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी यांच्या स्मारकासंदर्भात माहिती दिली. स्मारकासाठी विद्यापीठासमोर जागा उपलब्ध करण्यात आली आहे. याठिकाणी स्मारकचबुतरा आणि ॲम्पीथेअटर असणार आहे. ॲम्पिथेअटरमध्ये डॉकुमेंटरीद्वारे अहिल्यादेवींच्या कार्याचाशौर्याची माहिती दिली   जाणार आहे. विद्यापीठाच्या पत्रावरसुद्धा अहिल्यादेवींच्या फोटोचा लोगो करण्यात आला आहे.

            शासनाकडून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्मारकाचे काम 6 मार्च 2022 अथवा 31 मे 2022 पर्यंत पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहेत. जगाला अभिमान वाटावा आणि नव्या पिढीला आदर्श ठरावेअसे स्मारक उभारणार असल्याचे पालकमंत्री श्री. भरणे यांनी यावेळी सांगितले.      

बैठकीत समितीच्या सदस्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा हातात धरलेली शिवपिंडावरील पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण देशभरात अहिल्यादेवींचा फोटो हा हातात शिवपिंड धरलेला असून लोकांच्या मनात तोच फोटो परिचित असल्याचे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे एकमतांनी शिवपिंड हातात धरलेला अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. प्रभारी कुलसचिव डॉ. घुटे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post