उस्मानाबाद - (कुंदन शिंदे)
उद्या बैल पोळा सणासाठी बाजारपेठ सजली असून शेतकऱ्यांनी साहित्य खरेदीसाठी गर्दी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण वाढले होते. अनेक घरात एखादा तरी मृत्यू असल्याने ते शेतकरी हा सण उत्साहाने साजरा करू शकणार नाहीत. मात्र काळ्या आईची सेवा करण्यासाठी ज्यांचा उपयोग केला जातो त्यांचे ऋण फेडण्यासाठी हा वर्षातील एकच दिवस असतो. या सणाच्या निमित्ताने बैलांची पूजा करून त्यांना नागंरापासून दूर ठेवले जाते.
शेतकऱ्यांसाठी सदैव कष्ट करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजही ग्रामीण भागातील लोक पोळ्याला खूप महत्त्व देतात शेतकरी हा बैलांच्या भरोशावर काळ्या मातीची सेवा करतो त्यामुळेच त्यांच्या घरात अन्नधान्य,सुखसंपदा असते बैलपोळ्या सणाच्या आदल्या दिवशी खांदे मळणी केली जाते दुसऱ्या दिवशी पोळा हा सण उत्साहात पार पाडला जातो या दिवशी ग्रामदैवत व शेतातील इतर देवतांची पुजा केली जातो तसेच गावातून बैलांची मिरवणूक काढली जाते.
सध्या यांत्रिक कारणांमुळे जमिनीची मशागत ट्रॅक्टरद्वारे होत असल्याने गोठ्याच्या दावणीला बैलांची संख्या कमी झाली आहे.
उस्मानाबाद शहरात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी बैलांना लागणाऱ्या सजावटीसाठी सकाळपासूनच गर्दी केली होती शहरात बैलांच्या मूर्ती सुध्दा आल्या असल्याने बैलपोळ्या निमित्त या बैलांच्या मूर्तीच्या जोड्या खरेदी करताना नागरिक दिसत आहेत काही जण या बैलांच्या मूर्ती खरेदी करून घरी पुजा केली जाते