उस्मानाबाद शहरातील घडामोडींची वृत्तधारा

 


उस्मानाबाद शहरात कोरोना लसीकरण शिबिरास प्रतिसाद


उस्मानाबाद - शहरातील नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र क्र . १ वैराग रोड उसनाबाद व शम्स एज्युकेशन सोसायटी व उस्मानाबाद व ए.सी.एम. ग्रुप आणि युवा मशाल ग्रुप उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शम्सुल उलुम उर्दू हायस्कुल उस्मानाबाद येथे आज दिनांक ९ / ९ / २०२१ रोजी कोवीड व्हॅक्सीन ( कोवीशिल्ड १ ला व २ रा डोस ) १८ वर्षा वरील सर्व नागरीकांना देण्याचे आयोजन करण्यात आले उद्घाटक म्हणुन  शेख लईख अहमद अब्दुल रहिम व मुख्याध्यापक श रेशमा परवीन व वैद्यकीय अधिकारी डॉ . शकील खान सर ए.सी.एम. ग्रुपचे अध्यक्ष श्री अजहर चांद मुजावर , युवा मशाल ग्रुप चे  शेख जफर रब्बानी व त्यांचे सहकारी उपस्थित होते .

यावेळी प्राथमीक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, श्रीमती गायकवाड , PHN रत्नाकर पाटील , आरोग्य सेवक श्री काकडे, श्री मगर , श्री शिंदे , श्री चव्हाण, श्री शेट्टे , सिस्टर आशा वर्कर श्रीमती रहेमुन फातेमा , डाटा ऑपरेटर श्री समीर शेख लिपीक श्री नितीन सुरवसे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले. 138 लोकांना लसीकरण या शिबिरात करण्यात आले व या भागांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले .


मंत्री छगन भुजबळ निर्दोष ; समता परिषदेच्या वतीने जल्लोष

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद , शाखा उस्मानाबाद च्या वतीने आज  छगनरावजी भुजबळ  अन्न नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्री यांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता करून तसेच नवी मुंबईतील खारघर हाऊसिंग घोटाळ्या प्रकरणात माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे 

 या बद्दल आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,जिल्हा उस्मानाबाद च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले चौक , उस्मानाबाद येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला या वेळी पेढे वाटून गुलाल उधळून फटाके फोडून आजचा विजयी दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष महादेव माळी , तालुकाध्यक्ष रॉबिन बगाडे , सौ ज्योती सतिश माळाळे तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस उस्मानाबाद ,किरण एडके , सागर शेंडगे ,अक्षय थोरात तसेच बहुजन बांधव उपस्थित होते.

लोकप्रिय गायिका आशा भोसले जन्मदिनी गायनातून शुभेच्छा


उस्मानाबाद- शहरातील महसुल कॉलनी, गांधी नगर वडगावकर निवास येथे प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या ८८ व्या जन्मदिनानिमित्त छंदी हौशी गायक मेलडी स्टार समुहाच्या वतीने गायनातून शुभेच्छा दिल्या आशा भोसले यांच्या असंख्य लोकप्रिय गाण्याचे शुभेच्छापर गायन करण्यात आले . प्रथम समुहातील कु. प्रगती शेरखानेने नक्षत्राचे देणे मालिकेतील गीताच्या गायनाने सुरुवात करुन छंदी हौशी  गायक युवराज नळे, शेषनाथ वाघ, शरद वडगावकर, मुकुंद पाटील, तौफीक शेख, महेश उंबर्गीकर, जेष्ठविधिज्ञ दिपक पाटीलमेंढेकर,
अरविंद पाटील, धनंजय कुलकर्णी यांनी गीतांचे गायन केले.सुत्रसंचालन कु.वैष्णवी  व आभार शेखर वडगावकर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post