चोरीच्या शेळ्यासह दोन आरोपी अटकेत



उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : सलीम शेख, रा. जुनोनी यांच्या शेत गट क्र. 66 मधील शेडमधील 2 शेळ्या, 1 कोकरु व 1 बोकड दि. 15- 16 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले होते. यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 231 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत दाखल आहे.

गुन्हा तपासादरम्यान उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. चे पोनि- श्री. साबळे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोफौ- किशोर रोकडे, पोहेकॉ- तुगावकर, पोना- समाधान वाघमारे यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करुन व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जुना बस डेपो, उस्मानाबाद येथील 1) सोमनाथ रामा काळे 2)दिपक लक्ष्मण चव्हाण यांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीच्या शेळ्या व गुन्ह्यात वापरलेली कारसह कटर, मारतुल जप्त केले आहे.  


इतर बातम्या


 

अवैध मद्य विरोधी कारवाई.

नळदुर्ग पोलीस ठाणे : सुधामती सुभाष सगर, रा. होर्टी, ता. तुळजापूर या दि. 21 सप्टेंबर रोजी आपल्या राहत्या घरासमोर 5 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगल्या असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळल्या. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभा करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”


तामलवाडी पोलीस ठाणे : वैजिनाथ मारुती सावंत, रा. काटी, ता. तुळजापूर यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी 16.30 वा. सु. तामलवाडी टोलनाक्याजवळील महामार्गावर आपल्या ताब्यातील ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 एजे 1776 हा रहदारीस धोकादायकपने उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.


 


“चोरी.”


शिराढोन पोलीस ठाणे : शहाजी जंगली शेळके, रा. खामसवाडी, ता. कळंब यांनी त्यांचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएस 7751 हा गावातील तडवळा रस्त्यालगत लावला असता दि. 19- 20 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री त्या ट्रॅक्टरची पुढील दोन्ही चाके व स्टेअरींग सिट अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शहाजी शेळके यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 


“अपहरन.”


तामलवाडी पोलीस ठाणे : ठेकेदार- अप्पु हुदप्पा खुबसद, रा. सातारा व विठ्ठल एलगौड गौर, रा. सालोटगी, ता. इंडी, जि. विजापूर या दोघांत जुन्या आर्थिक व्यवहारावरुन वाद आहे. अप्पु खुबसद यांनी माळुंब्रा येथील 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्राचे काम घेतले असून त्या ठिकाणी आनंद परशुराम गोळसंगी, रा. मुघळखोड, ता. रायबान, जि. बेळगाव हे पर्यवेक्षक म्हणुन काम पाहत असुन तेथे 7- 8 कामगार आहेत. विठ्ठल गौर यांनी दि. 19 सप्टेंबर रोजी 15.00 वा. सु. त्या ठिकाणी जाउन बेकायदेशीर जमाव जमवून अप्पु खुबसद यांच्या सोबतच्या आर्थिक व्यवहारावरून पर्यवेक्षक गोळसंगी व कामगार- मुकेशराम धनीराम, रा. झारखंड या दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच त्या दोघांना जबरदस्तीने क्रुझर गाडी क्र. के.ए. 28 एन 5561 मध्ये बसवून त्यांचे उपहरन केले व अप्पु खुबसद यांना, “माझे पैसे न दिल्यास या दोघांना सोडणार नाही.” अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या अप्पु खुबसद यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 364 (अ), 365, 385, 504, 506, 143, 147 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 


“अपघात.”


उमरगा पोलीस ठाणे : चालक- शिवकुमार हणमंत सुंटनुरे, रा. कसगी, ता. उमरगा यांनी दि. 14 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. कसगी येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. के.ए. 32 ईक्स 2695 ही चुकीच्या दिशेने, निष्काळजीपने चालवून नरसिम्मा विठ्ठल हुगार, रा. हित्तल शिरुर, ता. आळंद, जि. कलबुर्गी, राज्य- कर्नाटक हे चालवत असलेल्या मोटारसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात नरसिम्मा हे जखमी झाले तर मो.सा. वर पाठीमागे बसलेली त्यांची आई- जयश्री विठ्ठल हुगार, वय 45 वर्षे या मयत झाल्या. अशा मजकुराच्या नरसिम्मा हुगार यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 


“मारहान.”


परंडा पोलीस ठाणे : हनुमंत श्रीधर पाटील, रा. लोणी, ता. परंडा यांच्या शेतातील पावसाचे पाणी गावकरी- अमोल पोपट मटकर यांच्या शेतात येत असल्याने दि. 20 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. लोणी शिवारात अमोल यांनी हनुमंत यांना ते पाणी अडवण्यासाठी सांगीतले. यावर चिडून जाउन हनुमंत पाटील यांनी अमोल यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अमोल मटकर यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.



No comments:

Post a Comment