नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प पाच पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा

वारणानगर :

श्री . जोतिबा देव नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात . नवरात्रोत्सवाच्या  तिसऱ्या माळे निमित्त कमळ पुष्प पाच पाकळ्यातील महापूजा बांधली . या पुजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे . नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री . जोतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते . त्यांचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपडयाच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली. मानाचे गावकर  यांनी बांधली .तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक अवताराचे प्रतिक आहे . दोन पाकळ्या या सगुण _ निर्गुण भक्तीचे प्रतिक मानले जाते .ही पूजा मानाचे दहा गावकर यांनी बांधली . सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला . नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो .  मच्छिंद्र डवरी, गजानन डवरी , विश्वनाथ डवरी यांनी डवरी गीते सादर केली .

 


Post a Comment

Previous Post Next Post