सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीसाठी विक्रमी ३८७ अर्ज दाखल

 


चेअरमन दिलीपतात्या पाटील, खासदार संजय काका पाटील व सुरेश भाऊ पाटील यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

तासगाव/ सांगली प्रतिनिधी

सांगली  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक तथा वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आदींसह १३४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर विद्यमान संचालक तथा माजी अध्यक्ष बी.के. पाटील, उदयसिंह देशमुख, झुंझारराव शिंदे या तिघांनी अर्ज दाखल न करता निवडणूक रिंगणातून माघार घेतली. तर कालच खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादीचे तासगाव कवठेमहांकाळ चे नेते संचालक सुरेशभाऊ पाटील, डॉ. प्रताप नाना पाटील, कमलताई पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील भाऊ पाटील, कवठेमहांकाळ तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या श्रीमती अनिता ताई सगरे, शिवसेनेचे नेते अरुण नाना खरमाटे, त्यांच्या पत्नी सौ खरमाटे इत्यादी दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत बँकेच्या आज अखेरच्या इतिहासात विक्रमी संख्येने एकुण ३८७ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी (ता.२५) छाननी असून माघारीसाठी ९ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.


बँकेच्या २१ जागांच्या निवडणुकीत दुसऱ्या दिवशी ७, तिसऱ्या दिवशी ४२, चौथ्या दिवशी २०४ तर आज शेवटच्या दिवशी १३४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आज शेवटच्या दिवशी अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक विशाल पाटील, संचालक बाळासाहेब होनमोरे, संचालक श्रद्धा चरापले, सांगली चे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आटपाडी पंचायत सभापती हर्षवर्धन देशमुख, तानाजी पाटील, मनोज शिंदे, ऋषिकेश लाड, सुयोग सुतार, नगरसेवक राजेंद्र कुंभार, वैभव शिंदे, वैभव पवार, अमित पाटील, सुरेश खोलकुंबे, योजना शिंदे, अलकादेवी पवार, जमील बागवान, भक्तराज ठिगळे, मन्सूर खतीब, आकाराम मासाळ, प्रेमलाताई साळी, जयकर कदम, गजेंद्र कुल्लोळी आदींचे १३४ अर्ज दाखल झाले. विद्यमान संचालक बी.के. पाटील, उदयसिंह देशमुख, झुंझारराव शिंदे यांनी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे सध्या तरी विद्यमान २१ संचालकांपैकी १८ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. माघारीपर्यंत आणखी काही संचालकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दिवाळीनंतर ९ नोव्हेंबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.


 *निवडणुकीसाठी दाखल अर्ज* 


गट एकुण अर्ज


विकास संस्था गट ‘अ’ १०७


महिला राखीव गट ‘ब’ ३६


अनुसूचित जाती-जमाती गट ‘ब’ २२


इतर मागासवर्ग गट ‘ब’ ३२


विमुक्त जाती, भ.ज. गट ‘ब’ २७


शेती संस्था ‘क’ १ २८


कृषी पणन प्रक्रिया ‘क’ २ १३


नागरी बँका, पतसंस्था ‘क’ ३- ७०


इतर संस्था, व्यक्ती सभासद ‘क’ ४ -५२


एकुण ३८७

सदरची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व शिवसेना एकत्रित येत भा.ज.प च्या विरुद्ध निवडणूक लढणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post