दैनिक जनमत : किलज मध्ये कोरोना योद्ध्यांचा करण्यात आला सन्मान

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Sunday, October 17, 2021

किलज मध्ये कोरोना योद्ध्यांचा करण्यात आला सन्मान



सलगरा,दि.१७(प्रतिक भोसले)

तुळजापूर तालुक्यातील किलज येथील बळीराजा चॅरिटेबल ट्रस्ट आणि खंडूराज शिंदे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने किलज येथील कोरोना संकट काळात गेल्या दोन वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या गावातील सर्व कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कोरोनाच्या काळात निस्वार्थी भावनेने सामाजिक कर्तव्य व जबाबदारी समजून गावासाठी कार्य केलेल्या, कर्तव्य बजावलेल्या एकूण २६ जणांना कोरोना योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दसरा सणाचे औचीत्य साधत हा कार्यक्रम घेण्यात आला, या वेळी कोरोना योद्धांनी कार्यक्रमात आपली मते मांडली, कार्यक्रमात कोरोना योद्धे म्हणून किलज गावच्या सरपंच अर्चना शिंदे, उपसरपंच दिक्षा गवळी, पोलीस पाटील सुनीता मर्डे, तंटामुक्त अध्यक्ष नागनाथ शिंदे, आशा कार्यकर्त्या छाया गवळी, निर्मला निर्मळे, सारिका शिंदे, प्रभावती भोईटे, किलज ग्रामपंचायत क्लर्क गोविंद शिंदे, संगणक परिचालक प्रदीप शिंदे, पत्रकार राम जळकोटे, वैभव मर्डे, ग्रामपंचायत कर्मचारी इरणा स्वामी, दत्ता सोमवंशी, जाकीर पटेल, शरद शिंदे, किरण शिंदे, अशोक शेळके, उमेश पवार, धनराज येलुरे, सुदर्शन शिंदे, किलज गावचे तलाठी माने, किलज ग्रामपंचायत ग्रामसेवक सचिन चौधरी, जि.प.शाळा किलज येथील सहशिक्षक मोरे, मसेकर आदींना हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी उपस्थित बळीराजा ट्रस्टचे अध्यक्षा संगीता राठोड, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, सचिव आनंद निर्मळे, पंचायत समिती सदस्य खंडेराव शिंदे, शिवाजी पांचाळ, संजय सोनटक्के, अमोल शिंदे, सचिन बिडवे, उमेश भोईटे, महेश माने, नामदेव गायकवाड, विलास मर्डे, विश्वनाथ बिडवे, यांच्या सह ग्रामस्थ, महिला तसेच युवक वर्ग उपस्थित होते.