उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील पुरातन ऐतिहासिक स्थळांच्या सर्वेक्षण आणि पुनरुज्जीवनासाठी स्थापन अभ्यासगटात केतन पुरी यांची निवड झाली आहे.
औरंगाबाद विभागात जगप्रसिध्द पुरातन स्थळे असुन अनेक ऐतिहासिक पुरातन स्थळे देखील आहेत. पुरातत्व विभागाच्या यादीत नोंद नसलेली परंतु दुर्लक्षित स्वरुपात असलेली व ऐतिहासिक घटनाचे साक्षीदार असलेली अशी अनेक स्थळे जसे की स्मारक, शिलालेख, शिल्प, बारव, समाधी, ऐतिहासिक घटना घडलेले स्थळ इत्यादी अस्तित्वात आहेत. ऐतिहासिक वारस असलेल्या अशा दुर्लक्षित स्थळांचे जतन व संवर्धन न केल्यास सदर स्थळे काळाच्या ओघात नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या ऐतिहासिक वारसाचे जतन केल्यास हा अमूल्य ठेवा येणा-या पिढयांसाठी प्रेरणादायी ठरेल. तसेच या स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास पर्यटन वृध्दी व त्याअनुषंगाने रोजगार निर्मितीस देखील चालना मिळेल. यासाठी औरंगाबाद विभागातील सर्व ऐतिहासिक पुरातन स्थानांचे सर्वेक्षण करुन त्याचे दस्तऐवजीकरण करणे, सदर ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करणे व पर्यटनाच्या दृष्टीने विकास करुन पर्यटन वृध्दी करणे यासाठी विभागात उपक्रम राबविण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे.
शिल्प, यास्तव उपरोक्त उपक्रम राबविण्यासाठी जिल्हयातील पूरातन स्थळे जसे की, स्मारक, शिलालेख, बारव, समाधी, ऐतिहासिक घटना घडलेले स्थळ इत्यादी चे सर्वेक्षण करण्यासाठी इतिहास संशोधक/ इतिहास अध्यापक व पूरातत्व विभागाचे प्रतिनिधी व पर्यटन विभागाचे प्रतिनिधी यामध्ये केतन पुरी यांचा समावेश करुन जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या अभ्यासगटात सहायक अभिरक्षक पुरातत्त्व तेर, उपसंचालक पर्यटन औरंगाबाद यांचा समावेश आहे तर सदस्य सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हे आहेत.
No comments:
Post a Comment