एस. टी. संपाचा विविध स्तरांवर फटकाउस्मानाबाद (कुंदन शिंदे) - मागील १६ दिवसांपासून एस.टी.कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सर्व स्तरावर परिणाम होत असल्याचे दिसत आहेत बसस्थानकातून एकही बस आगराबाहेर न पडल्याने रिक्षाचालक, व्यापारी,रूग्ण तसेच बसस्थानकात व्यवसाय करणाऱ्या वर झाला आहे.बसस्थानकाच्या परिसरात प्रवाशांना विविध ठिकाणी पोचविण्यासाठी ठिय्या मांडून बसणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे मागील १६ दिवसांपासून बसस्थानकातून बस सुटल्या नसल्यामुळे रिक्षा चालक शहरात फिरून व्यवसाय करत आहेत.ग्रामीण भागातील शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी दररोज शहरात येतात हे शेतकरी बसला कमी तिकीट असल्याने  हा भाजीपाला बसमधून शहरात आणून विकत असत मात्र खाजगी वाहनातून भाजीपाला शहरात आणून विकता येत नाही कारण की खाजगी वाहनधारक दुप्पट तिकिटाचे पैसे घेत आहेत त्यातच जे कामगार दररोज शहरात येऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागत होता अशा कामगारांना ये जा करण्यासाठी वाहनधारकांना जास्त पैसे द्यावे लागत आहेत.नागरिकांची कामे विविध कार्यालयांत असतात कोणाची कोर्टात तारीख असते कोणाचे तहसील कार्यालय कामे असतात अशा नागरिकांना बस बंद असल्याने हे कामे करण्यासाठी सकाळी पासून इतरांच्या हातपाय जोडावे लागते त्यातच कोणतेही वाहन न भेटल्यास ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी धडपड करून यावे लागत आहे.एस.टी.कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे सामान्य माणसाला याचा जास्त फटका बसत आहे त्यांची एकच मागणी आहे की बससेवा लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post