काकांच्या पालखी सोहळ्याचे तेर मध्ये रोषणाई फटाक्यांची आतषबाजी ने स्वागत




तेर प्रतिनिधी :तेर येथील  श्री संत शिरोमणी  काकांचा पालखी सोहळा मजल दरमजल  करीत रवीवार दि.२८  रोजी सांयकाळी  तेर नगरीत दाखल झाला शिवाजी चौकात  सरपंच नवनाथ नाईकवाडी उपसरपंच रविराज चौगुले यांनी पालखीचे स्वागत केले. 

तेर त येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काका यांचा पायी पालखी सोहळा प्रतिवर्षी प्रमाणे आयाही भाऊबीजेला पंढरपूरातील कार्तिक  एकादशी साठी शेकडो वारक-यासह  रवाना झाला होता. 

 पोर्णिमा  पर्यंत चा  कार्तिक सोहळा संपवून  दिनांक १९ नोव्हेंबर रोजी तेरच्या दिशेने मार्गस्थ  झालेल्या संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा येवती , खंडोबाचीआवाडी , कुंभेज , कापसेवाडी , काळेगाव , सावरगाव पिंपरी , कौडगाव , सांजा , काजळा या मार्गे पायी प्रवास करत  दिनांक २८ रोजी  टाळ मृंदगाच्या तालावर हरी नामाचा जयघोष करत सायंकाळच्या सुमारास दाखल झाला।सडा रांगोळी व रोषणाई सह फटाक्यांची आतषबाजी ने पालखीचे स्वागत करण्यात आले

  यावेळी तेरसह परिसरातील भाविकांनी पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी  सर्वत्र भक्तीमय वातावरणात निर्माण झाले होते यावेळी परंपरेने ठरलेल्या ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्रिवीक्रम मंदिरात   कीर्तन सेवा संपन्न झाली गोरोबा काकांच्या राहत्या घरी पालखीची आरती झाल्यानंतर तब्बल २२ दिवसांपासून सुरू असलेल्या पालखी सोहळा विसावला.

Post a Comment

Previous Post Next Post