भाजप जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न

 भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद वतिने प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालय धाराशिव येथे जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न झाली .या बैठकीस भाजपा मराठवाडा संघटन मंत्री  संजय कोडगे व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली .सर्वप्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, या कोरोना सारख्या महामारी मध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक मृत पावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऍड खंडेराव चौरे यांनी शोकप्रस्ताव घेतला, भाजप जिल्हा समन्वयक नेताजी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन ठराव सादर केला ,त्यानंतर भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठचे संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी राजकिय अराजकता या विषयावर सखोलपणे विश्लेषण केले .नंतर संजय कोडगे यांनी भाजपच्या विविध कार्यक्रमांचे मार्गदर्शन करताना ते यशस्वी पणे राबविण्यात यावेत असे सांगितले. शेवटी काळे यांनी सर्व उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना या महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येवून 2 वर्षे उलटली परंतु एकही निर्णय जनतेच्या  हितासाठी घेण्यात आलेला नाही. वारंवार केंद्र सरकारला बोट दाखवणा-या राज्य सरकारने मात्र पेट्रोल व डिझेल वरील अबकारी कर देखील कमी केला नाही. राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात शेतक-यावर आलेल्या संकटात फक्त आणि फक्त बघ्याची भुमीका घेतलेली आहे. ना शेतक-यांना पिकविमा ‍मिळाला ना शेतक-यांना ठरल्याप्रमाणे नुकसानग्रस्त शेतक-यांना  रु. १० हजार रुपयामध्येही अर्धवटच म्हणजे ४००० ते ५००० हजार इतकीच मदत देण्यात आली. जिल्हयाचे पालकमंत्री हे फक्त झेंडावंदन करण्यासाठीच येतात परंतु जिल्हयातील चालू समस्या जानुन घेण्यासाठी अथवा बैठकीसाठी त्यांच्याकडे वेळच नाही असेही नितीन काळे यांनी सांगीतले. सत्तेत राहून एकही निर्णय जनतेच्या हितासाठी न घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने काम करावे असे सांगितले.वाशी तालुक्यातील कॅप्टन संकेत चेडे यांची भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल भाजपा धाराशिव जिल्ह्याच्या वतीने संजय कोडगे व नितीन काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,उस्मानाबाद जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी सौ. अर्चना अंबुरे यांची निवड झाल्या बद्दल भाजपा धाराशिव जिल्ह्याच्या वतीने संजय कोडगे व नितीन काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,तसेच जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे यांची पंचायत समिती धाराशिवच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीला जिल्ह्यातील विविध मोर्चा अध्यक्ष ,सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष,मंडळ अध्यक्ष ,जिल्हा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment