सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय

विरोधी भाजप आघाडी चा दारुण पराभव, चार उमेदवार विजयी

तासगाव प्रतिनिधी

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकासआघाडी व विरोधात भाजप असा सरळ सामना रंगला होता यामध्ये यापूर्वीच महाविकास आघाडीच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या उर्वरित १८ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले होते त्याचा आज निकाल जाहीर करण्यात आला होता यामध्ये राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषी, समाज कल्याण राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम व राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई आर आर पाटील, आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती,आज जाहीर झालेल्या निकाला पैकी महा विकास आघाडीचे १४ तर भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल

विजयी उमेदवार

१)विशाल पाटील काँग्रेस/मिरज सोसायटी गट

२)आ.मोहनराव कदम काँग्रेस/कडेगाव सोसायटी गट

३)महेंद्र लाड काँग्रेस/पलूस सोसायटी गट (बिनविरोध)

४)जयश्री मदन पाटील काँग्रेस /महिला गट

५)अनिता सगरे राष्ट्रवादी/महिला गट

६)दिलीप पाटील राष्ट्रवादी/वाळवा सोसायटी गट

७)आ.मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी/शिराळा सोसायटी गट (बिनविरोध)

८)बी एस पाटील राष्ट्रवादी/तासगाव सोसायटी गट

९)प्रकाश जमदाडे भाजपा/जत सोसायटी गट

१०)तानाजी पाटील शिवसेना/आटपाडी सोसायटी गट

११)आ.अनिलभाऊ बाबर शिवसेना/खानापूर सोसायटी गट (बिनविरोध)

१२)अजितराव घोरपडे शिवसेना/कवठेमहांकाळ सोसायटी गट

१३)वैभव शिंदे राष्ट्रवादी/पाणीसंस्था गट

१४)मन्सूर खतीब राष्ट्रवादी/ओबीसी गट

१५)बाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादी /अनुसुचित जाती जमाती गट

१६)राजेंद्र उर्फ चिमण डांगे राष्ट्रवादी/भटक्या जमाती

१७)सुरेश पाटील राष्ट्रवादी/प्रक्रिया गट

१८)पृथ्वीराज पाटील काँग्रेस/पतसंस्था

१९)राहुल महाडिक भाजपा/पतसंस्था

२०)संग्रामसिह देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट

२१)सत्यजित देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट

No comments:

Post a Comment