दैनिक जनमत : महावितरण कडून वीज पुरवठा चार दिवसापासून बंद

Friday, November 19, 2021

महावितरण कडून वीज पुरवठा चार दिवसापासून बंद

   पिंपळगाव (लिं) (शिवराम शिंदे) 

        वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येतील सब टेशन मधून पिंपळगाव पिंपळगाव परिसरातील गेल्या चार दिवसापासून महावितरण कडून वसुलीसाठी वीज पुरवठा चार दिवसापासून बंद केला आहे त्यामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची शक्यता त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे मात्र पाण्याविना पिके वाया जाण्याची शेतकऱ्यांसमोर संकट उभे टाकले आहे यावर्षी खरीप हंगाम सुरुवातीला चांगला पाऊस झाला परंतु मध्ये एक ते दीड महिना पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात कसे बसे आलेल्या पिकाची काढणी चालू असता ने सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑक्टोबरच्या अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने वाया गेला त्यात कसाबसा शेतकरी सावरतो न सावरतो तर महावितरण कंपनीकडून वसुली साठी चार दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

            रब्बी हंगाम हरभरा ज्वारी गहू इत्यादी पिके पाण्याविना वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडल्यासारखे आहे त्यातच शासनाकडून नुकसानीपोटी मिळालेली तुटपुंजा त्यातच आत्ता वीज वितरण कंपनीकडून वसुली साठी शेतकऱ्याची क्रूर चेष्टा चालवली आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे एकीकडे आपला देश कृषीप्रधान याच कृषिप्रधान देशामध्येअसून सु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तरी शासनाने याकडे लक्ष देऊन वीज तोडणी थांबून शेतकऱ्याला जीवदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.