दैनिक जनमत : सक्षणा सलगर यांच्या हस्ते जलपूजन

Saturday, November 13, 2021

सक्षणा सलगर यांच्या हस्ते जलपूजन

 

पाडोळी(प्रतिनिधी)उस्मानाबाद तालुक्यातील (टाकळी बेंबळी) येथे आज (दि.१३) जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे अंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाल्या बंधाऱ्यातील जलसाठ्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

   सक्षणा सलगर यांच्या प्रयत्नामुळेच तेरणा नदीला मिळणाऱ्या ओढ्यावर हा सिमेंट नाला बंधारा बांधण्यात आला असून, आज या बंधाऱ्यात पूर्ण क्षणतेने पाणी थांबले आहे, याचा टाकळी(बेंबळी) शिवारातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी हे समाधान व्यक्त करत आहेत. या जलपूजना वेळी माजी सरपंच काकासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रताप गायकवाड, मलिक शेख, बालाजी माने, महादेव गाडेकर, शिवशांत काकडे, प्रशांत सोनटक्के, सुरज नरवडे, अरुण खटके यांच्या मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.