दैनिक जनमत : जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उस्मानाबाद ते मुंबई सायकल प्रवास

Tuesday, November 23, 2021

जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उस्मानाबाद ते मुंबई सायकल प्रवास

 


उस्मानाबाद - २६ /११ च्या हल्ल्या शहीद झालेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील एक युवक उस्मानाबाद ते मुंबई असा प्रवास करणार आहे.  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मानवी हक्क विभाग उस्मानाबाद च्या वतीने २६/११ शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली येथील अमोल चव्हाण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उस्मानाबाद ते मुंबई हा प्रवास सायकलीवरून करणार आहेत. आज उस्मानाबाद येथून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. यावेळी ॲड विश्वजीत शिंदे, खलिल सय्यद, बालाजी नायकल, प्रभाकर लोंढे आदी उपस्थित होते. 

अमोल चव्हाण यांनी यापूर्वी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आरोग्य लाभन्यासाठी उस्मानाबाद ते मुंबई प्रवास केला आहे.