किलज येथे पार पडले लाळ्या खुरकूत लसीकरण व सर्व रोग निदान मोफत शिबीर


सलगरा,दि.१३(प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे बळीराजा चॅरिटेबल ट्रस्ट किलज आणि पशुसंवर्धन दवाखाना श्रेणी - २ होर्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ नोव्हेंबर रोजी किलज गावातील सर्व पशु, जनावरे यांच्यासाठी लाळ्या खुरकूत लसीकरण व सर्व रोग निदान मोफत शिबीर पार पडले. या शिबिरात पशुसंवर्धन दवाखाना होर्टी येथील डॉ.एन.जे.वागदकर हे उपस्थित होते, डॉ.वागदकर यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले, या मोफत शिबिरात गावातील एकूण २०० पशु, जनावरे यांची तपासणी पार पडली, या कार्यक्रमाचे आयोजन बळीराजा चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा संगीता राठोड, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, सचिव आनंद निर्मळे यांनी केले होते, तर या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य खंडूराज शिंदे,आनंद निर्मळे, तुकाराम शिंदे, नागनाथ शिंदे, दत्ता सोमवंशी, शरद शिंदे, धनराज येलुरे, अशोक शेळके, दयानंद कुठार, जनार्धन शिंदे, सचिन बिडवे, धनराज शिंदे, हनुमंत मोजगे, शिवाजी पांचाळ, राम भोसले, साहेबराव दुधंबे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment