कुस्ती निवड चाचणीत पौर्णिमा खरमाटेला सुवर्णपदकउस्मानाबादची सुवर्ण कन्या ठरली अजिंक्य !!

उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित दि. 28 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद मुक्कामी 15 वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड चाचणी घेण्यात आली.यामध्ये उस्मानाबादची महिला कुस्तीगीर पोर्णिमा प्रभाकर खरमाटे हिने 62 किलो वजनीगटात प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. अटीतटीच्या सामन्यात पोर्णिमा हीने सुवर्ण पदकाची कमाई करून महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले. पोर्णिमा ही शरद पवार हायस्कुलमध्ये सध्या दहावीत शिकते. तर सह्याद्री कुस्ती संकुलात कुस्ती प्रशिक्षण घेत आहे. मागील दोन वर्षात तिने विविध पदकांची कमाई केली होती. पोर्णिमाच्या सार्थ निवडीबददल शासकिय क्रिडा मार्गदर्शक  संदिप वांजळे सर,कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव पै.वामनराव गाते , मार्गदर्शक गोविंद घारगे ,सुंदर जवळगे व उस्मानाबाद जिल्हा तालीम संघाचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले . झारखंड येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment