दैनिक जनमत : शहराची ३० वर्षाची गरज भागवणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा डीपिआर सर्वसाधारण सभेत मंजूर

Tuesday, December 14, 2021

शहराची ३० वर्षाची गरज भागवणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा डीपिआर सर्वसाधारण सभेत मंजूर

पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला जाणार प्रस्ताव

उस्मानाबाद - उस्मानाबाद नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली या सभेत तब्बल चारशेहून अधिक विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.  या सभेच्या प्रारंभी नगरपालिकेचे मुख्याधिकारी हजर नसल्याने  नगरसेवक शिवाजी पंगुडवाले यांनी ही सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली मात्र इतर नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांशिवाय सर्वसाधारण सभा सुरू ठेवण्यास  हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर  सभेचे कामकाज  सुरू करण्यात आले. येणाऱ्या काळात नगरपालिकेचे स्वताचा ॲप तयार करणार आहे त्यासाठी निविदा काढण्यासाठी एकमताने परवानगी देण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज पाहता ५४ एम एल डी पाणी याजनी धरणातून मिळावे यासाठी डी पी आर तयार केला आहे यावर देखील सर्वसाधारण सभेत चर्चा झाली.


ती कामे होणार का? 

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कधी नव्हे ते ४०० हून अधिक विविध विकास कामांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सर्वानुमते ते विषय मंजूर करण्यात आले असले तरी त्या कामांना आवश्यक असणारी तांत्रिक मंजुरी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यकाळ संपत आला असताना सर्वसाधारण सभेत विषय मंजूर करुन घेऊन विकासकामांचा पाठपुरावा केल्याचा भ्रम निर्माण केला जात असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.



'दिलखुष' करणे पडले महागात, लाच घेताना घेतले ताब्यात

  उस्मानाबाद - जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही दिवसांत गाजत आहेत.  महात्मा गांधी रोजगार हमी...