आरोग्य विभाग पेपरफुटीचे उस्मानाबाद कनेक्शन भूम ग्रामीण रुग्णालयाच्या दोघांचा समावेश

 


उस्मानाबाद - आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी उस्मानाबादचे कनेक्शन समोर आले आहे. भूम ग्रामीण रुग्णालयाच्या सहायक अधिक्षक कार्यालयातील क्लार्क राजेंद्र सानप आणि ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप जोगदंड, या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. संदीप जोगदंड यांची महिन्यापूर्वी अंबेजोगाई येथे बदली झाली आहे. क्लार्क सानप आणि डॉ. जोगदंड बदलीनंतर देखील संपर्कात होते. डॉ. जोगदंड यांना २१ सप्टेंबर रोजी भूम ग्रामीण रुग्णालयातून कार्यमुक्त केले आहे तर राजेंद्र सानप १ डिसेंबर पासून ग्रामीण रुग्णालयात गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे.  या प्रकरणी काल एकूण पाच जणांना अटक झाली आहे तर यापूर्वी सहा जणांना अटक झाली आहे. आरोग्य विभाग गट ड साठी  ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा झाली होती. हे पेपरफुटी चे प्रकरण आरोग्य विभागाची नाचक्की करणारे ठरले होते. या पेपर फुटी प्रकरणी पैश्यांची देवाणघेवाण कशी झाली आणखी यात कोणाचा समावेश आहे का याचा तपास सायबर पोलीस करत असून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post