विज चोरी विरोधात विजवितरण कंपनीची धडक कारवाई
 कपिलापूरी,आवार पिपरी येथील ४३ विजचोरांवर दंडात्मक कार्यवाही

दंडात्मक रक्कम न भरल्यास गुन्हे दाखल करणार -अमेय वनारी

परंडा (भजनदास गुडे )दि १८ विज वितरण कंपनीचे औरंगाबाद येथिल सह व्यावस्थापकीय संचालक गोंधवले यांच्या आदेशा नुसार व परंडा विज वितरण कंपणीचे उपकार्यकारी अभियंता अमेय वनारी यांच्या मागदर्शना खाली  विज चोरा विरुध्द परंडा तालुक्यात धडक मोहिम सुरू करण्यात आली आहे .

       दि १८ डिसेंबर रोजी विज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता अमेय वनारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सिराळा शाखेचे कनिष्ठ अभियंता सचिन बुरूंगे,यांच्या नेतृत्वाखाली विज चोरी रोखन्या साठी पथक प्रमुख कनिष्ठ अभियंता सुरज नायर, कनिष्ठ अभियंता,अंकुश जाधव कर्मचारी अशोक विभुते,राजेंद्र वाघमारे,इरफान शेख,देवीदास अलाट,ज्ञानेश्वर जाधव,मनिष वाघमोडे,समाधान शिंदे,कृष्णा मुळीक,जोगदंड यांच्या पथकाने  आवार पिपरी,कपिलापुरी येथे पहाटे पाचच्या दरम्यान धाडी मारल्या

      या घाडीत आवार पिपरी येथे २३ ठिकाणी तर कपिलापुरी येथे २० ठिकाणी आकडे टाकुन विज चोरी करीत असल्याचे आढळून आले आहे. 

    या सर्व विज चोरा विरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन दंडाची रक्कम न भरल्यास विजचोरी कलम १३५ नुसार फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता सचिन बुरंगे यांनी दिली आहे .

      विज चोरा विरूध्द कारवाई करण्यासाठी परंडा तालूक्यातील सर्व गावामध्ये धाडी मारून तपासणी करण्यात येणार आहे .

विज चोरी केलेल्या लोकांचे विजेचा वापर बघून ५ हजार ते २० हजार रुपये पर्यंत दंड करण्यात येत आहे .

          परंडा तालूक्यातील ज्या लोकांनी आधिकृत विज जोडणी केलेली नाही त्यांनी विज वितरण कार्यालयात रितसर अर्ज दाखल करून अधिकृत विज जोडणी करून घ्यावी व ज्यांची विज जोडणी कायम खंडीत करण्यात आलेली आहे त्यांनी थकबाकी भरून विज जोडणी कऊन घ्यावी असे आवाहन परंडा विज वितरण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे .

     विज चोरांना आता सावध होण्याची गरज असुन आकडे टाकलेले आढळल्यास कडक कारवाई करन्यात येणार आहे. विज चोरी विरूद्ध चे पथक अचानक धाडी मारुन कारवाई करणार आहे .

Post a Comment

Previous Post Next Post