दैनिक जनमत : सरकार हरवले आहे, भाजपची पोस्टरबाजी

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Friday, December 17, 2021

सरकार हरवले आहे, भाजपची पोस्टरबाजी




उस्मानाबाद - डिजिटल प्रचारतंत्राचा वापर करणारी भाजप आता पारंपरिक पोस्टरबाजीकडे वळली आहे. सरकार हरवले आहे असे पोस्टर उस्मानाबाद भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमधून ठाकरे सरकारवर खोचक टीका देखील करण्यात आली आहे.


काय आहे पोस्टरमध्ये...

एसटीच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न चिघळला आहे. कित्येक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. मात्र, ठोस तोडगा नाहीच. जनतेला त्रास होतोय तो तर वेगळाच.

• आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये सावळागोंधळ दिसून आला. पेपर फुटले, पाठोपाठ म्हाडा परीक्षांचेही पेपर फुटले. आता टीईटी परीक्षांबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

• शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शिक्षण खाते तोंडघशीच पडले. निर्णयही न्यायालयाकडून रद्द झाले.

एमपीएससीच्या परीक्षांबाबतही घोळ. स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येला सहा महिने उलटूनही अद्याप आयोगच कार्यान्वित झाला नाही, परीक्षा तर दूरच.

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही हेच झाले. मागासवर्ग आयोगाची कार्यकक्षा वाढवण्याची फाइल तीन महिन्यांपासून धूळ खात पडून आहे.

• मराठा आरक्षणावर न्यायालयात बाजू मांडण्यात सरकार म्हणून तुम्ही कमी पडलात.

महाविकास आघाडी सरकार... अहो तुम्ही तुमचे मंत्री आणि नेते राजकीय कलगीतुऱ्यांमध्ये आणि मस्त मलईमध्ये रमले आहेत. सामान्य जनता होरपळून निघतेय. तुम्ही परत या. जिथे असाल तिथू परत या. ठोस निर्णय घ्या. लोकांना दिलासा द्या. सरकार म्हणून काही तरी 'करून दाखवा'.

आपल्या प्रतीक्षेत, महाराष्ट्रातील १२ कोटी जनता अश्या आशयाचे पोस्टर लावून भाजपने सरकारवर  नवे टीकास्त्र सोडले आहे.

कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती

 चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदा...