दैनिक जनमत : मुलाच्या निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा? भाजपने केली ऊर्जामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Wednesday, December 8, 2021

मुलाच्या निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा? भाजपने केली ऊर्जामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

 


उस्मानाबाद - ऊर्जामंत्री मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभारले आहेत त्यांच्या प्रचारासाठी विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला असून या प्रकरणात ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे. कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलासाठी काम न कैल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव आणून धमकावले जात आहे. राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडालेला असताना ऊर्जामंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्र प्रेमासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहे. हे योग्य नाही. सरकारी पदाचा गैरवापर कैल्या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत याचा त्यरित राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे 

यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे,ओम नाईकवाडी, राज निकम, गणेश एडके, प्रितम मुंडे ,हिम्मत भोसले, मनोज सिंह ठाकूर, स्वप्नील नाईकवाडी, अमरसिंह ढोबळे, देवकन्या गाडे, प्रज्ञा परिट आदी उपस्थित होते.
कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती

 चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदा...